ETV Bharat / state

Nawazuddin Siddiqui case : मुले आलियासोबत राहत होती, आता कुठे आहेत माहित नाही; नवाजुद्दीन सिद्दीकीची उच्च न्यायालयात धाव

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आता हे सर्व प्रकरण थेट न्यायालयात पोहचले आहे.

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी
author img

By

Published : Feb 24, 2023, 1:27 PM IST

Updated : Feb 24, 2023, 1:39 PM IST

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी याने पत्नी आलियाचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी परक्या पूरूषासोबत आहे. ती काही काळ दुबईत राहून भारतात परतली होती. पत्नी आलिया हीने देखील अंधेरी न्यायालयांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी विरोधात घरगुती हिंसाचार कायद्यानुसार याचिका दाखल केली होती. मात्र आता नवाजुद्दीन सिद्दिकी याने आपली मुले कुठे आहेत, हे माहित नाही ते जाणून घेण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे, आणि याचिका दाखल केली आहे.

आलियाच्या दाव्या नुसार : नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने टॉर्चर केल्याचा देखील आरोप नवाजुद्दीनवर केला आहे. आलियाच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, आलिया यांना बाथरुम वापरण्यापासून रोखण्यात आले होते. इतकेच नाही तर बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करत बेडरूम लॉक करण्यात आले होते. मुलांचे खर्च उचलण्यासही नवाजुद्दीन सिद्दीकी याने नकार दिला होता. अंधेरी न्यायालयात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात आलिया सिद्दीकीने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामधील वाद वाढताना दिसत आहे.

नवाजुद्दीनला नोटीस : आलिया हिच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी याला नोटीस पाठवली होती. कायद्यानुसरा आलियाच्या तक्रारीनंतर नवाजुद्दीन याला त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरी न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहायचे होते. न्यायालयाच्या नोटीसनंतरही नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कुटुंबियांच्यावतीने कोणीही न्यायालयात हजर झाले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकिलही न्यायालयात हजर राहिले नाहीत.

नवासुद्दीनची याचिका : यासंदर्भात नवासुद्दीन सिद्दिकी याच्या दुबईतील घरामध्ये जी घरकाम करणारी महिला आहे तिने समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये नवासुद्दीन सिद्दिकी याने फसवणूक केल्याचे म्हटले आहे. तिला तिच्या कामाचा योग्य मोबदला दिला गेला नाही. असा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून तिने केला होता. त्यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दिकी याने आपली मुले दुबईला होती आणि तेव्हा आलिया त्या ठिकाणी राहत होती. मात्र आता माझी मुल् तिच्याजवळ आहेत की कुठे आहेत याबद्दल शंका असल्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत धाव घेतली.

हेही वाचा : Nawazuddin Siddiqui Case : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा दिलासा, हुंडा छळाची फेटाळली याचिका

Last Updated : Feb 24, 2023, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.