ETV Bharat / state

Nawab Malik : नवाब मलिक यांचा खासगी रुग्णालयातील मुक्काम वाढला - Nawab Malik stay at private hospital extended

मलिक यांना 6 जानेवारीपर्यंत मुंबईतील कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याकरिता आणखीन मुदतवाढ देण्यात आली ( Nawab Malik Treatment Time Extentend till 6 Jan ) आहे. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र डॉक्टर हजर न राहू शकल्याने अहवाल सादर करता आला नाही. त्यामुळे त्यांचा मुक्काम वाढला ( Nawab Malik stay at private hospital extended ) आहे.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 23, 2022, 3:38 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. मलिक यांना 6 जानेवारीपर्यंत मुंबईतील कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याकरिता आणखीन मुदतवाढ देण्यात आली ( Nawab Malik Treatment Time Extentend till 6 Jan ) आहे. नवाब मलिक यांचे जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश रुग्णालयातील किडनी तज्ञ डॉक्टरांना देण्यात आले होते. मात्र डॉक्टर आज हजर न राहू शकल्याने अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत मलिक यांचा मुक्काम कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयातच राहणार ( Nawab Malik stay at private hospital extended ) आहे.

नवाब मलिक यांच्या उपचारासाठी मुदतवाढ : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अहवाल अद्याप सादर न झाल्याने न्यायालयाने रुग्णालयातील उपचाराकरिता आणखी मुदतवाढ दिली ( Nawab Malik Treatment Time Extentend ) आहे. नवाब मलिक यांच्यावर अहवाल सादर करेपर्यंत खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू राहण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहे. मात्र याला ईडीने विरोध केला आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 6 जानेवारीपर्यंत मुक्काम वाढवून दिला आहे. नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयातील उपचाराची आवश्यकता नसून त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात यावी अशी मागणी ईडीने मुंबई सत्र न्यायालयात केली होती. तसेच या प्रकरणात डॉक्टरांचे एक पथक तयार करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील लेखी स्वरूपात मुंबई सत्र न्यायालयात केली होती. या मागणीवर निर्णय प्रलंबित असतानाच न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जे जे रुग्णालयातील किडनीवर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टराला नवाब मलिक यांची तपासणीकरून रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र रिपोर्ट प्राप्त न झाल्याने नवाब मलिक यांना पुन्हा 6 जानेवारीपर्यंत कुर्ल्यातील पीटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराला आणखी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.

खासगी रुग्णालयातील उपचारावर ईडीचा अक्षेप : मुंबई सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मलिक यांना कुर्ल्याच्या क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली आहे. मलिक हे किडनी विकाराने त्रस्त आहेत. मागील सहा महिन्यांपासून खासगी रुग्णालयात दाखल असून उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालयातच उपचार घेण्यासाठी मलिकांचा सत्र न्यायालयाला विनंती अर्ज केला होता. मात्र खासगी रुग्णालयातील उपचारावर ईडीने अक्षेप घेतला ( ED Objection To Private Hospital Treatment ) होता. सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टात या संदर्भात होणारी सुनावणी 6 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. नवाब मलिक यांची एक किडनी मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. दुसरी किडनी देखील काही प्रमाणात खराब झाली आहे.

नवाब मलिक यांच्यावर काय आरोप : हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप ( What allegations against Nawab Malik ) आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.