ETV Bharat / state

Nawab Malik : दहशतवादी फंडिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; 17 एप्रिलला पुढील सुनावणी - नवाब मलिक जामिन

दहशतवादी फंडिंग प्रकरणी नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम 14 दिवसापर्यंत वाढला आहे. त्यांना 17 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांना जामिन मिळालेला नाही.

Nawab Malik
राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Apr 3, 2023, 2:48 PM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली गेली आहे. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ही वाढ केली आहे. नवाब मलिक यांनी किडनी विकार असल्याचा दावा केला होता. त्यासाठी वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्यांनी अर्ज केला. जामीनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दहशतवादी फंडिंग केला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. कुख्यात आरोपी आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी दाऊदसोबत कथित गैरव्यवहार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

गैरव्यवहार केल्याचे पुरावे : मलिक रुग्णालयात दाखल असल्यामुळे मलिक यांना न्यायालयात हजेरी लावण्यापासून न्यायालयाने सूट दिली आहे. मात्र जामीनाबाबत अद्यापही कोणताही निर्णय न्यायालयाकडून आलेला नाही. त्याबाबत सरकारी पक्ष अर्थात ईडीने दावा केला आहे की, त्यांच्याबाबत गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देता कामा नये. आता 17 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.

दहशतवादी फंडिंग केल्याचा मुख्य आरोप : नवाब मलिक यांची तब्बेत पाहता त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे तब्येत ठीक नसल्याने त्यांना जामीन मिळावा, म्हणून त्यांच्या वतीने वकिलांनी अर्ज केला आहे. मात्र न्यायालयाने जामीन काही दिला नाही. न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी वाढवली. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या विशेष पीएमएलए कोर्टात आज सुनावणी झाली. शिंदे फडणवीस शासनाने त्यांच्यावर आरोप ठेवला आहे की, त्यांनी दाऊद इब्राहिम संबंधित असलेल्या मालमत्ता मलिक यांनी खरेदी केल्या होत्या. त्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर केला आहे. त्यातून दहशतवादी फंडिंग केल्याचा मुख्य आरोप आहे. 17 एप्रिलला न्यायालयात काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : CM Shinde On Traitor Statement: 'ते' विधान नवाब मलिकांसाठी; 'देशद्रोही' या विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.