मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
16 जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदलातील कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. पण, या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलची मुंबई कार्यकारिणी स्थापन झालेली नाही. मात्र, काहीजण असंघटित कामगार सेलच्या नावाखाली काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे कोण काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली - किरीट सोमैया
हेही वाचा - सर्व यंत्रणांनी समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करावी - मुख्यमंत्री