मुंबई - गुजरात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे, असे मोदी बोलत असतील आणि आज महाराष्ट्र 1 नंबरवर असल्याचे फडणवीस बोलत आहेत. तर मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे? हे देशातील जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना दिले आहे.
हेही वाचा - आरे वृक्षतोड प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांना शिवसेनेकडून धमक्या
सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र 1 नंबरला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले आहे. त्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी हे आव्हान दिले.
हेही वाचा - बनावट घड्याळांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या एकाला अटक
याअगोदर नरेंद्र मोदी गुजरात हे देशात सर्वच क्षेत्रात 1 नंबरवर आहे. आजही गुजरात 1 नंबरवर आहे, असे बोलत होते, असेही नवाब मलिक म्हणाले.