ETV Bharat / state

भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी मंत्री तानाजी सावंतांचे खेकड्यांवर खापर - नवाब मलिक

तिवरे धरण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होवून, दोषी आमदाराला शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मोठ्या भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत हे खेकड्यांवर खापर फोडत असल्याचेही मलिक म्हणाले.

author img

By

Published : Jul 5, 2019, 3:38 PM IST

नवाब मलिकांचा तानाजी सावंतांवर निशाणा

मुंबई - तिवरे धरण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होवून, दोषी आमदाराला शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मोठ्या भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत हे खेकडयांवर खापर फोडत असल्याचेही मलिक म्हणाले.

शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटीमध्ये दोषी असलेल्या स्वतः च्या आमदाराला वाचवण्यासाठी खेकडयांवर खापर फोडले आहे. याचा चांगलाच समाचार नवाब मलिक यांनी घेतला. तानाजी सावंत यांनी खेकडयांवर केलेला आरोप हा निर्लज्जपणाचा कळस आहे. स्वतः च्या आमदाराला यातून बाहेर काढण्यासाठी केलेले वक्तव्य आहे. जनता हे सहन करणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

सावंत हे आपल्या आमदाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून, या सगळ्या प्रकरणात शिवसेनेचा आमदार दोषी असल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी मलिक यांनी केली.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.