ETV Bharat / state

लालसेपोटी पक्षांतर करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही - नवाब मलिक - काँग्रेस

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:51 AM IST

मुंबई - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काही लोक भीती आणि लालसेपोटी पक्षांतर करत असून जनता त्यांना साथ देणार नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

देशाच्या राजकारणात आता नवीन अध्यायाला सुरुवात झाली असून, तो अध्याय हा 'डर और लोभ' असल्याचे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक नेते इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.

  • देश की राजनीती में कुछ समय से एक नया अध्याय शुरु हुआ है,
    "डर और लोभ" का !
    कुछ लोग डर कर और कुछ लालच में दल बदल रहे है,
    याद रहे भारत की जनता लालची और डरपोकों का साथ नही देती ! #IndianPolitics #Congress #NCP pic.twitter.com/NzgDsVigad

    — Nawab Malik (@nawabmalikncp) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:'कुछ लोग डर कर और कुछ लालच में दल बदल रहे हैं,'- नवाब मलिक यांचा ट्विट

मुंबई, ता. २७ :

राष्ट्रवादी काँग्रेस मधून मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात नेते भाजपामध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपामध्ये जात असलेल्या आपल्या नेत्यांना संदर्भात एक ट्विट करत..."कुछ लोग डर कर और कुछ लालच में दल बदल रहे हैं, ' असे म्हटले आहे.
देशाच्या राजकारणात आता नवीन अध्यायाला सुरुवात झाली असून तो अध्याय हा "डर और लोभ" आहे असेही मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यानंतर राष्ट्रवादीतून अनेक नेते इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आज राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचे नाव समोर आल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आपल्या मध्ये ही भावना व्यक्त केली आहे. त्यातले ट्विटमध्ये म्हणतात...
"देश की राजनीती में कुछ समय से एक नया अद्ध्यय शुरू हुआ है,
"डर और लोभ" का ।
कुछ लोग डर कर और कुछ लालच में दल बदल रहे हैं,
याद रहे भारत की जनता लालची और डरपोकों का साथ नही देती।"
नवाब मलिक यांच्या या ट्विट मधून भाजपाच्या दबावाच्या राजकारणावर मलिक यांनी बोट ठेवले असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणात अनेक नेते सेना भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे .
--
सुमारे दहा आमदारांची राष्ट्रवादीतून गळती
राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये दहा आमदारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून अनेक जण सेना आणि उर्वरित भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश आहे. यात आमदार वैभव पिचड, आमदार संग्राम जगताप, राहुल जगताप यांचा समावेश असून ते तीनही आमदार मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. यासोबत बार्शीतील आमदार दिलीप सोपल आणि माढ्यातील आमदार बबन शिंदे यांनी शिवसेनेत जाण्यासाठी तयारी केली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक, उस्मानाबाद येथील राणा जगजितसिंह आणि साताऱ्यातून मागील काही दिवसांत शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपात जाण्याचे निश्चित केल्याचे बोलले जात आहे.
--
दबाव आणि लालसेपाटी पक्षांतर
नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटप्रमाणे भाजप- सेनेत जाणाऱ्यांची संख्या अधिक असली तरी अनेक जण हे भीती आणि दबावापोटी सोडत असल्याचेही बोलेल जात आहे. त्यात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांना यापुढे निवडून येण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. तर वैभव पिचड यांना भाजपाकडून मोठी लालच दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच बबन शिंदे यांच्या साखर कारखान्यामुळे अडचणी वाढविण्यात आल्याने त्यांना भाजपात गेल्याने अभय मिळणार आहे तर तीच गत राणा जगजितसिंह यांची असून अनेक संस्थांना अभय मिळेल म्हणूनच ते भाजपात जाणार आहेत.दिलीप सोपल यांचेही असेच आहे. नवी मुंबईतही भाजपाचा प्रभाव वाढल्याने माजी मंत्री गणेश नाईक यांचा दबदबा कमी झाल्याने संदीप नाईक हे ऐनवेळी भाजपात प्रवेश करणार असून रायगडमधून अवधूत तटकरेही आपल्या चुलत्यासोबत राजकीय स्पर्धा करण्यासाठी भाजपात जाणार असल्याचे सांगण्यात येते.Body:'कुछ लोग डर कर और कुछ लालच में दल बदल रहे हैं,'- नवाब मलिक यांचा ट्विट
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.