मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यावेळी जनता परिवर्तन करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राज्यातील विधानसभा निवडणुका या खुल्या वातावरणात आणि पारदर्शकपणे होतील, अशी अपेक्षा आम्ही करत असल्याचे मलिक म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना-भाजपला मत विभाजनाचा मोठा फायदा झाला होता. त्यामुळे त्यांचे सरकार आले होते. ते यावेळी होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. राज्यात बेरोजगारीचे प्रचंड प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशा वेळी राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - दिवाळीपूर्वीच निवडणुका; २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ला मतमोजणी
हेही वाचा - भुसावळ मतदारसंघ : युतीत जागेचा तर आघाडीत उमेदवाराचा तिढा
आजपासून आचारसहिंता लागू
महाराष्ट्रासह हरियाणामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.