ETV Bharat / state

हिंमत असेल तर लोकसभेची फेर निवडणूक घ्या, फडणवीसांना प्रति आव्हान - विधानसभा निवडणूक

हिंमत असेल तर परत विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान रविवारी नवी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

nawab malik
हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक घ्या, नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रति आव्हान
author img

By

Published : Feb 17, 2020, 5:29 PM IST

मुंबई - हिंमत असेल तर विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभेची निवडणूक घ्यावी, असे प्रति आव्हान आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान रविवारी नवी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात फडणवीस यांनी दिले होते.

हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणी सरकार एसआयटी स्थापन करणार; नवाब मलिक यांची माहिती

हा वाढत जाणारा आजार-

भाजपला अजुनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. राज्यात हातून सत्ता गेल्याने ते सैरभैर झाले आहेत. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला असून दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार ते करीत असतात. एवढेच नाही तर रोज रात्री त्यांना सत्तेचीच स्वप्न पडतात. हा वाढत जाणारा आजार असून आम्हाला त्यांची काळजी वाटते. यावर त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असा उपरोधिक सल्लाही यावेळी मलिक यांनी दिली.

हेही वाचा - ''कोणता विवेकी माणूस असे बोलतो? प्रतिगामी मूर्ख विधान''

भाजपच्या काही लोकांना वाद आहे हे दाखवण्याची सवय झाली आहे. बऱ्याच वृत्त वाहिन्या आणि पत्रकारांना आघाडी सरकारमध्ये वाद आहेत हे दाखवण्यात रस आहे. मात्र, ते वास्तव नाही. आम्ही आघाडीतील सर्व मंत्री एकजुटीने काम करत असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.