मुंबई : Nashik Drug Case : नाशिकमधील वाढत्या ड्रग्स प्रकरणासंदर्भामध्ये शिवसेना ठाकरे घटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. याप्रकरणी २० ऑक्टोबरला शिवसेना ठाकरे गटाकडून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रश्नावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane on Nashik Drug Case) यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. ड्रग्सविरोधात मोर्चा काढायचा असेल तर तो मातोश्रीवर (Nitesh Rane on Thackeray Group) काढा, असा सणसणीत टोला राणेंनी लगावलाय. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ड्रग्स माफिया जेलमध्ये होते : याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर संजय राऊत यांना आता उडता महाराष्ट्र आणि उडता नाशिक आठवलाय. यांच्या काळात सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्सबाबत कडक भूमिका घेतली असे हे बोलत होते. पण, प्रत्यक्षात ड्रग्सचं प्रमाण यांच्याच काळात वाढलंय. यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तुमच्यासारखे जे खिचडी चोरतात, तुमच्या मालकाचा मुलगा जो अमली पदार्थाचा बादशहा आहे, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री झाल्यावर वठणीवर आणलं. रश्मी शुक्ला यांचं नाव ऐकल्यावर यांच्या मालकावर झोपेची गोळी घ्यायची वेळ आली.
ड्रसमध्ये पीएचडी : तुम्हाला जर ड्रग्सविरोधात मोर्चा काढायचा असेल तर तो मातोश्रीवर आणि डीनो मोरीयाच्या घरी काढा. तुमच्या मालकाचा मुलगा त्यावेळी रोज संध्याकाळी काय फराळ घ्यायचा हे आम्हाला माहिती आहे, असं सांगत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केलाय. तसेच ड्रग्स आणि अमली पदार्थात तुमच्या मालकाच्या मुलानं पीएचडी केली असेल. कर्जतच्या फार्म हाऊसच्या फ्रीजमध्ये आयुष्यभर पुरेल असा साठा सापडेल, असंही राणे म्हणाले.
भाजपामध्ये येणार होते : संजय राऊत यांच्या कुटूंबानं स्वतःचं संरक्षण वाढावं म्हणून स्वतःच्या कार्यकर्त्याकडून हल्ला करून घेतला. सुनील तटकरे म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांना भाजपामध्ये यायचं होतं. ते बोलले ते खरं बोलले. स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी मी भाजपात येतो हे सांगणारे उद्धव ठाकरे होते, असा आरोपही नितेश राणे यांनी केलाय.
हेही वाचा -
- Sassoon Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या घरातून पोलिसांनी जप्त केलं 3 किलो सोनं; नाशिकमधील घरी झाडाझडती
- Congress On Lalit Patil Escape Case: 'या' प्रकरणी मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत यांचा त्वरित राजीनामा घ्या; कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंचा फोटो व्हायरल; सुषमा अंधारे म्हणाल्या...