मुंबई Naresh Goyals ED custody - ईडीकडून नरेश गोयल यांना अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायाधीशांच्या समोर हजर केले. त्यावेळी युक्तिवाद केला की, अनेक घोटाळे गोयल यांच्या नावावर आहेत. त्यांनी बँकांची रक्कम एकत्रित करून कर्ज उचललेले आहे. आणि ही मोठी हेराफेरी आहे. कॅनरा बँकमध्ये फॉरेन्सिक ऑडिटमधून हे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये 1152 कोटी रुपये रकमेचा वापर यांनी दुसऱ्याच कारणासाठी केलेला आहे. तर कन्सल्टिंग फीच्या नावाने 2500 कोटी रुपयेचे उचललेले कर्ज त्यांनी रिपेमेंटसाठी वापरलं. ते या प्रकरणात चौकशीसाठी सहकार्य करीत नाही. त्यामुळे त्यांची कोठडी वाढून मिळावी, अशी विनंती ईडीकडून करण्यात आली.
आज दुसऱ्यांदा न्यायालयात नरेश गोयल यांना न्यायालयात हजर केलं. त्यावेळी नरेश गोयल यांच्यावतीनं वकील नाईक यांनी बाजू मांडली की, त्यांची शारीरिक स्थिती नाजूक आहे. वय भरपूर झालेले आहे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे या आधारावर न्यायालयाने विचार करावा, अशी विनंती केली. तर गोयल हे चौकशीला सहकार्य करीत नसल्यामुळे त्यांची कोठडीची गरज असल्याचं ईडीचे वकील सुनील गोंझालविस यांनी सांगितले.
न्यायालयाने आपल्या आदेश पत्रात नमूद केले, की रोज सकाळी आठ ते नऊ या काळामध्ये 15 मिनिट आरोपी नरेश गोयल हे पत्नी अनिता यांना भेटू शकतात. त्यांची उपलब्धतेची खात्री संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे करायची आहे. जेजे सरकारी रुग्णालयामध्ये आरोपीची नियमित तपासणी केली जाईल. जर अतिगंभीर आजार असेल अथवा खाजगी उपचाराची गरज वाटल्यास तसा सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने अहवाल दिल्यास विचार केला जाईल. ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे नरेश गोयल यांना स्वतःच्या घरची उशी व चादर वापरता येईल, असे देखील न्यायालयाने आपल्या आदेश पत्रात नमूद केलेले आहे. त्याबाबत जे जे रुग्णालय त्यांची नियमित तपासणी करून त्यांच्या तब्येतीची काळजी घेईल. मात्र आता. खाजगी दवाखान्यात उपचार करण्याची परवानगी न्यायालयाने नाकारली. यासंदर्भात पुढील सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होईल.
14 सप्टेंबरपर्यंत नरेश गोयल यांना ईडीची कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्नीला पंधरा मिनिटे भेटू शकतात. फोन देखील करू शकतात-नरेश गोयल यांचे वकील नाईक
हेही वाचा-