मुंबई - विधानसभा निवडणुकीत सर्वात अधिक १०४ जागांचे बलाबल असलेला भाजप उद्या विधीमंडळ नेत्याची निवड करणार आहे. यासाठी भाजपने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड केली आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर आणि अविनाश राय खन्ना हे उद्या मुंबईमधील पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजप विधीमंडळ नेत्याची निवड होणार आहे. अमित शाह हे मुंबईमधील बैठकीला उद्या येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-राज्यात नवे समीकरण...! काँग्रेसने दिले शिवसेनेबरोबर जाण्याचे संकेत?
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेमधील भागीदारीवरून तणावाची स्थिती आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.