मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापा टाकण्यात आला होता. तिने एनडीपीएस कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार होती. मात्र करिश्मा सुनावणीसाठी हजर झाली नाही आणि तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ती फरार झाल्याचा संशय सध्या व्यक्त होत आहे. करिश्माचा जबाब घेण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तिला समन्स बजावण्यात आले आहेत.
दीपिकाची मॅनेजर करिश्माला एनसीबीकडून समन्स, याचिकेवरील सुनावणीस गैरहजर - SUMMONES TO KARISHMA PRAKASH
अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाशला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून समन्स बजावण्यात आले आहेत. करिश्मा फरार झाल्याचा संशय आहे.

दिपीकाची मॅनेजर करिश्माला पोलीस कंट्रोल ब्युरोकडून समन्स
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून छापा टाकण्यात आला होता. तिने एनडीपीएस कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार होती. मात्र करिश्मा सुनावणीसाठी हजर झाली नाही आणि तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ती फरार झाल्याचा संशय सध्या व्यक्त होत आहे. करिश्माचा जबाब घेण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) तिला समन्स बजावण्यात आले आहेत.
दिपीकाची मॅनेजर करिश्माला पोलीस कंट्रोल ब्युरोकडून समन्स
एनसीबीने करिश्मा प्रकाशच्या घरावर छापा टाकून अमली पदार्थ जप्त केले होते. तिच्या घरात चरस आणि सीबीडी ऑइल आढळले होते. मात्र करिष्मा प्रकाश घरात नसताना एनसीबीने टाकलेला छापा कायद्याच्या विरोधात असल्याचे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती तिच्या घरामध्ये हजर नसेल तर, तिच्या घरातून एनसीबीला अमली पदार्थ कसे काय मिळाले? असा सवालही तिच्या वकिलांनी उपस्थित केला आहे. करिश्मा प्रकाश हिला अगोदरही तीन वेळा एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी करिश्मा प्रकाशने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य केले होते. मात्र सध्या बेपत्ता असल्याने तिला समन्स बजावण्यात आले आहेत.
इतर आरोपींच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पूर्ण
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी स्वतंत्र तपास सुरू केला होता. एनसीबीने आतापर्यंत 20पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. त्यातील अंकुष अनरेजा, करंजीतम सिंग, सूर्यदीप मल्होत्रा, राहिल विश्राम व रवी प्रसाद यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी पूर्ण झाली. याचा निकाल बुधवारी देण्यात येणार आहे.