ETV Bharat / state

Narayan Rane On Reservation: कोणताच मराठा 'कुणबी' प्रमाणपत्र घेणार नाही - नारायण राणे - कुणबी प्रमाणपत्र

Narayan Rane On Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन धगधगत आहे, असं असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. राज्यातील कोणताही मराठा हा 'कुणबी' प्रमाणपत्र घेणार नाही. कोणताच मराठा कुणबी जात लावून घेणार नाही, असं वक्तव्य राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केलंय. तसंच सरसकट आरक्षण न देता आर्थिक आणि सामाजिक मागास निकषांवर द्यावं, असंही ते म्हणाले.

Narayan Rane on Reservation
केंद्रीय मंत्री नारायण राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 7:42 PM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिक्रिया

मुंबई Narayan Rane on Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन हे प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन संपवलंय. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आपण अभिनंदन करतो. तसंच दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी 20 परिषदेमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. जगभरातून आलेले प्रतिनिधी या ठिकाणी अत्यंत उत्साहानं सहभागी झाले. सर्वांचं समाधान झालंय. अतिशय नेटकं आणि देखणं नियोजन करून भारतानं जगात स्वतःची मान उंचावलीय. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही आपण अभिनंदन करतो, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.

सरसकट आरक्षण : मराठा आरक्षणासंदर्भात आणि कुणबी जात प्रमाणपत्रा संदर्भात सुरू असलेलं आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संपुष्टात आलंय. मात्र, राज्यात कुणालाही सरसकट आरक्षण देणं अयोग्य आहे, असं नारायण राणे यांनी यावेळी बोलून दाखवलंय. मराठा समाजालाही आर्थिक आणि सामाजिक मागास निकषांवर आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी यावेळी राणे यांनी केलीय.

कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही : यावेळी बोलताना राणे म्हणाले की, कुणबी हे जात प्रमाणपत्र कोकणात आणि काही ठिकाणी विदर्भात मराठा समाजाला मिळतं. मात्र, सरसकट मराठा समाज हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. कोणताही मराठा स्वतःची जात कुणबी म्हणून लावून घ्यायला तयार होणार नाही, असा खळबळजनक दावाही राणे यांनी यावेळी केलाय. त्यामुळं कुणबी जात प्रमाणपत्र देण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्यावं, असं राणे म्हणाले. घटनेच्या कलम 15/4 प्रमाणं राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार आहे. मात्र, तत्पूर्वी मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे, हे मागास आयोगासमोर सिद्ध करावं लागेल. मागास आयोगाच्या अहवालानुसार केंद्राकडे प्रस्ताव पाठवूनच आरक्षण दिलं जाईल, अन्यथा कोणालाही आरक्षण देण्याचा अधिकार नाही. मग कोणीही कितीही उपोषण केलं तरी त्याला अर्थ नाही, असंही नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. (Narayan Rane on Maratha Reservation)

प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करा : प्रकाश आंबेडकर यांनी देशातील पाच महत्त्वाच्या मंदिरांवर हल्ला होणार असल्याबाबत वक्तव्य केलंय. या संदर्भात विचारलं असता नारायण राणे म्हणाले की, अत्यंत धक्कादायक अशी माहिती आहे. ही माहिती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कुठून आली, याची सत्यता पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी करावी. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करावी, अशी मागणी राणेंनी केलीय. (Maratha Reservation)

शिवसेनेचं शिव्या पत्र : सामना हे मुखपत्र नाही तर शिवसेनेचं शिव्या पत्र आहे, अशी टीका यावेळी राणे यांनी केलीय. सामनामधून जे छापून येतं, ते अतिरंजीत असतं. सामना हा केवळ उद्धव ठाकरे यांची फुशारकी करण्यासाठी आणि शिव्या देण्यासाठी काढला जातो, असंही ते म्हणाले. जो माणूस अडीच तास घराबाहेर पडला नाही, तो आता राज्यात दौरे करत आहे. कशासाठी हे दौरे करीत आहे, हिंदुत्वाशी गद्दारी कोणी केलीय, हे सर्वांना माहीत आहे असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. Jalna Maratha Protest : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे
  2. CM Eknath Shinde On Viral Video : व्हिडिओ व्हायरल करण्याचा खोडसाळपणा; मराठा समाज आणि सरकारमध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  3. Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चात जरांगे पाटलांच्या लेकीची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.