ETV Bharat / state

Disha Salian Case : नारायण राणे, आमदार नितेश राणे ५ मार्चला वाजता मालवणी पोलिसांसमोर हजर होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) यांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल ( Malvani Police Station ) एफआयआरविरोधात अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. राणेंचे वकील सतीश मानशिंदे ( Satish Manshinde ) यांनी दिंडोशी न्यायालयात ( Dindoshi Court ) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

author img

By

Published : Mar 4, 2022, 4:44 PM IST

Disha Salian Case
नारायण राणे आणि नितेश राणे

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane ) यांचा मुलगा आणि भाजप आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) यांनी मालवणी पोलीस ठाण्यात दाखल ( Malvani Police Station ) एफआयआरविरोधात अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. राणेंचे वकील सतीश मानशिंदे ( Satish Manshinde ) यांनी दिंडोशी न्यायालयात ( Dindoshi Court ) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयात पुढील सुनावणी होत नाही तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. नारायण राणे आणि आमदार नितेश राणे ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मालवणी पोलिसांसमोर हजर होणार आहेत.

ईटीव्ही भारत प्रतिनिधी याबाबत माहिती देताना

दोघे पिता-पुत्र ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियन यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मालवणी पोलिसांनी नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते.
त्यानंतर राणे कुटुंबीयांचे वकील सतीश मानशिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहून माहिती दिली की, आता दोघे पिता-पुत्र ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार आहेत, कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज सुरू झाले असल्याचे देण्यात आले आहे.

दिशा सालियानची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबीयांनी वारंवार केल्यानंतरही केंद्रीय लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टीका करत होते. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा आहे.

हेही वाचा - Ajit Pawar On OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारप्रमाणे विधेयक मांडणार - अजित पवार

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याचे सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे, आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियान कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून, मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता सालियान कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.