मुंबई - शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपली भूमिका बदलत असतात. सामनामध्ये आलेली नाणार प्रकल्पाची जाहिरात हे याचे उत्तम उदाहरण आहे. ठाकरेंनी भाजपला सरकार पाडून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. आम्ही सरकार पाडून दाखवतो की नाही, हे त्यांनी पहावे, असे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी म्हटले. भाजपची राज्यस्तरीय बैठक मुंबईमध्ये पार पडली. त्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाकरेंची वेगळी भूमिका होती. आता सामनामधून त्यांनी आपली दुसरी भूमिका जाहीर केली आहे. त्यांना तळ्यात-मळ्यात करण्याची सवय आहे, असे राणे म्हणाले.
हेही वाचा - हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा; ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान
राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेसाठी राणे यांनी शुभेच्छा दिल्या. नाणारबाबत भाजपची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका असेल, असेही ते म्हणाले.