मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला उल्लू बनवत आहेत, असे वक्तव्य भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदमध्ये शिवसेनेवर टीका केली.
राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार आहे. निवडणुकांपुर्वी युती झाली होती. शिवसेनेचे आताचे वर्तन नैतिकतेला धरून नाही. भाजपचे सरकार सत्तेमध्ये आणायचं असून याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या खांद्यावर टाकली आहे. याचबरोबर भाजप राज्यपालांकडे जाईल तेव्हा १४५ आमदारांची यादी हातात घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.