ETV Bharat / state

Dispute Over Nanar Project : नाणार प्रकल्प बारसू येथे करावा, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र - नाणार प्रकल्प बारसू येथे करावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात इतर ठिकाणी करण्यात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुर्वीच पत्र (Chief Minister's letter to the Prime Minister) पाठवले आहे. राजकीय वर्तुळात सध्या नाना प्रकल्प पुन्हा होणार का? या बाबत चर्चा सुरू आहे. त्यातच कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प कोकणातच "जेथे लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी पर्यावरणाचा समतोल राखून करण्यास हरकत नसल्याचे सूचक वक्तव्य केले होते.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Mar 30, 2022, 11:53 AM IST

Updated : Mar 30, 2022, 1:42 PM IST

मुंबई: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सत्तेत असलेल्या शिवसेनेने नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला प्रखर विरोध केला होता. स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प नानार मध्ये होऊ देणार नाही अशी ताठर भूमिका उद्धव ठाकरे यांनी तेव्हा घेतली होती. मात्र आता नाणार येथील प्रकल्प राजापूर मधील बारसू येथे घेण्यात यावा असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहल्याची माहिती समोर येत आहे. बारसु येथे असलेल्या तेरा हजार एकर जमीनलनीवर प्रकल्पासाठी योग्य जागा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.

खनिज तेल टर्मिनल साठी नोटे गाव येथे एकविसशे एकर जागा उपलब्ध असचे मुख्यमंत्र्यांनी कळवले आहे. बारसू येथे प्रकल्पासाठी सुचित करण्यात येणाऱ्या जागेवर 90 टक्के जागा रिकामी असल्याने विस्थावितांचा प्रश्न उद्भवणार नसून, पर्यावरणाचा समतोल राखून बारसू येथे प्रकल्प करण्याची विनंती करण्यात आली आहे. राजापूर येथे असलेल्या बारसू येथे तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प बनवण्यासाठी आता राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असल्याचेही सुत्रांकडून समजते आहे. तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प महाराष्ट्रात झाल्यास राज्याच्या उत्पन्नात भर पडणार असल्याने मुख्यमंत्र्यांकडून आता या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेहीवाचा : महाराष्ट्र लवकरच पूर्णतः निर्बंध मुक्तीकडे, मास्क सक्ती उठणार

Last Updated : Mar 30, 2022, 1:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.