ETV Bharat / state

Tweet Of Nana Patole : नाना पटोले यांचा नवा 'ट्विट बॉम्ब', म्हणे पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचा

author img

By

Published : Mar 14, 2022, 5:12 PM IST

Updated : Mar 14, 2022, 5:19 PM IST

अलीकडच्या काळात सगळ्याच निवडणुकांमधे काॅंग्रेस वाईट पध्दतीने पराभवाला (Bad defeat of Congress in elections) सामोरे जात आहे. राष्ट्रीय पातळीवरही नेतृत्व बदलावरुन घमासान सुरू आहे. यातच काॅंग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Maharashtra President Nana Patole) यांनी एक ट्विट करत पुढच्या निवडणुकांत महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच (next Chief Minister from the Congress) असेल असे म्हणले असुन राज्यात खळबळ उडवुन दिली आहे.

NANA PATOLE
नाना पटोलें

मुंबई: गेल्या काही वर्षात देशभरात काॅंग्रेस कायम पराभवाला सामोरे (Bad defeat of Congress in elections) जात आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत काॅंग्रेसला मोठे अपयश आले. पंजाब सारखे हक्काचे राज्य ही काॅंग्रेसने गमावले. त्यानंतर काॅंग्रेस मधिल असंतुष्ठांचा गटही आक्रमक होउ लागला होता. यातच काॅंग्रेस वर्किंग कमेटीने मॅरेथाॅन बैठक घेत पुढिल वाटचालीवर चर्चा केली. सध्या तरी सोनियां गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवण्यात आला असला तरी काॅंग्रेसमधे नेतृत्व बदलाचा प्रश्न आणि चर्चा दोन्ही वाढत आहे.

गोवा आणि 4 राज्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वासही वाढला आहे. भाजपने आता आधी मुंबई महापालिका आणि सोबतच महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचे मनसुबे जाहिर केले आहेत. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. महाविकास अघाडीला धक्के देण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. तसेच केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातुन काॅंग्रेस सह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना कोणत्याना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या निशाण्यावर कायम काॅंग्रेस राहीली आहे

असे असताना आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असे ट्विट करत खळबळ माजवुन टाकली आहे. एकीकडे महाविकास अघाडी भाजपला सत्तेपासुन रोकण्यासाठी एकत्रीत निवडणुका लढवण्याचा मनसुबा व्यक्त करत असताना नाना पटोले मात्र कायम स्वबळाची भाषा करत असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आहे का असे प्रश्न उपस्थित केले जातात. नाना पटोले यांच्या टार्गेटवर कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार असते. यातच आता त्यांनी हे ट्विट केल्यामुळे वेग वेगळ्या चर्चेला उधान येणार आहे.

  • २०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल.

    — Nana Patole (@NANA_PATOLE) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Mar 14, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.