ETV Bharat / state

Congress Meeting Mumbai : पटोले-थोरातांमधील वाद मिटणार? काँग्रेसच्या नेत्यांची रविवारी बैठक - एच के पाटील रविवारी मुंबईत

पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर रविवारी(12 फेब्रुवारी) मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, पटोले आणि थोरात यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

thorat patole
थोरात पटोले
author img

By

Published : Feb 11, 2023, 8:21 PM IST

मुंबई - शिक्षक, पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. डॉ. सुधीर तांबे यांना दिलेल्या एबी फॉर्ममध्ये पक्ष नेतृत्वाने केलेल्या चुका, अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर आणल्या. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. हा वाद इतक्यावरच थांबला नाही तर पटोले यांनी थेट तांबे यांना तोंड उघडायला लावू नका, असा सूचक इशारा दिला होता. दोघांमधील वाद तापला असताना, काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत थेट राजीनामा दिला. यापूर्वी माजी आमदार आशिष देशमुख यांनी पटोले यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. आता थोरात यांचा राजीनामा आल्याने काँग्रेस पक्ष नेतृत्वाला हादरा बसला आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न - संसदीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला घेरले होते. राज्यात मात्र काँग्रेसमध्ये शीतयुद्ध रंगले आहे. हा वाद मिटवण्यासाठी प्रभारी एच के. पाटील मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर प्रथम थोरात यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर 'हात से हात जोडो' या एमपीसीसी तर एमआरसीसीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. तसेच, सायंकाळी साडेसात वाजता काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न या बैठकीत होईल.

आघाडीच्या निशाण्यावर नाना - महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र, पटोले यांनी पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले. आघाडी सरकारला विश्वासात न घेता राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि आघाडी सरकार कोसळले. आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

थोरातांना स्थान नाही - काँग्रेसचे ३ दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगड, रायपूरमध्ये या महिन्यात २४ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधी होणार असून, या पूर्ण अधिवेशनात ९ राज्यांच्या निवडणुका आणि मिशन २०२४ च्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, या अधिवेशनासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मसुदा समिती आणि विविध उपसमूहांची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे या मसुदा समिती व विविध उपसमूहांमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना वगळण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.