ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील नर्तकीचं विवस्त्र नृत्य प्रकरण तापणार, खुद्द डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिले चौकशीचे निर्देश - Neelam Gorhe On Naked Dance Case

Naked Dance Case Bhandara: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथे १८ नोव्हेंबर रोजी डान्स हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Legislative Council Deputy Speaker) ज्यामध्ये एका नर्तकीनं विवस्त्र होऊन अश्लील डान्स केल्याची माहिती मिळत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात खळबळ माजली. विशेष म्हणजे, या घटनेची गंभीर दखल विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांना फोन करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. (Dr Neelam Gorhe)

Naked Dance Case Bhandara
डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिले चौकशीचे निर्देश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 5:48 PM IST

नर्तकीच्या न्यूड डान्स प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

मुंबई Naked Dance Case Bhandara: शेतीची कामं चालू असताना सांस्कृतिक जगतामध्ये किंवा कलाक्षेत्रामध्ये संगीत, नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे; परंतु ज्या प्रकारे याचं व्यापारीकरण होऊन नाचणाऱ्या स्त्रियांना विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं आणि मग पैसे उधळले जाणं हा जो निंदनीय प्रकार भंडारा जिल्ह्यात घडलेला आहे. ती केवळ एक घटना नसून तो गंभीर गुन्हा असल्याचं मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केलं. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.(Neelam Gorhe On Naked Dance Case)

महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं हा गुन्हा : भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचबरोबर मोहाडी तालुक्यातल्या बीड या ठिकाणी १७ नोव्हेंबर रोजी एका नर्तकीनं विवस्त्र होऊन डान्स केला. दरम्यान काही जणांनी तिच्यावर नोटा उधळल्या. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. यासंदर्भात, विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांच्याशी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये महिलेला विवस्त्र होण्यासाठी भाग पाडणं हा गुन्हा मानला गेला पाहिजे. तसंच रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे लोकांची गर्दी जमते आणि स्त्रियांना विवस्त्र करते, यामध्ये नोटा उधळल्या जातात. जेणेकरून त्यांनी अश्लील हावभाव करत नाचावं. त्यामुळे कायद्याचा भंग झालेला आहे, असं त्या म्हणाल्या.

तर पोलिसांनी नियमावली तयार करावी : विवस्त्र डान्स प्रकरणी काही स्थानिक राजकीय नेतेसुद्धा सापडलेले आहेत. ही अत्यंत निषेधार्थ आणि चीड आणणारी घटना आहे. या प्रकरणी कठोर कारवाई केली गेली पाहिजे. या प्रकारचं नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्या विवस्त्र नाचता कामा नये, हे त्यांना बंधनकारक करणं आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांनी एक व्यवस्थित नियमावली तयार करणं आवश्यक आहे, अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांना केलेल्या आहेत.

महिलांचे लैंगिक शोषण चीड आणणारे : ज्यावेळी डान्सबार विरोधी कायदा झाला त्यातसुद्धा अनेक बंधनं घालण्यात आली होती. सामान्य लोकांचा सहभाग ज्या कार्यक्रमात असतो त्यावेळेस अशा पद्धतीनं लोकांनी महिलांना विवश करून त्यांचं लैंगिक शोषण करणं किंवा त्यासारखं गुन्हे करणं ही अत्यंत चीड आणणारी घटना आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येसुद्धा सामाजिक भान आणि कायद्याची बुज राखली गेली पाहिजे, असंही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. Obscene Dance Of Girl: पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स; लोकांनी उधळले पैसे
  2. Kolhapur Police हे कोल्हापूर आहे इथं असला धिंगाणा चालत नाही, अश्लील डान्स करणाऱ्यांसह आयोजकावर गुन्हा दाखल
  3. Police Raid On Dance Bar: भिवंडीतील 'सपना' डान्सबारवर पोलिसांचा छापा; १० बारबालांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.