मुंबई : पदवी निवडणुकांचा निकाल काही वेळात पुर्णत: स्पष्ट होणार आहेत. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये काँग्रेसचे सत्यजीत तांबे हे राजकीय घडामोडींत अपक्ष म्हणून ही निवडणुक लढवत आहेत. सर्वाधिक लक्ष तांबे यांच्या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागाचा निकाल समोर आला आहे.
नाशिक विभाग : नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. इथे काँग्रेसचे सत्यजीत तांबे मोठ्या राजकीय उलथापलथीनंतर अपक्ष उमेदवार आहेत. तर समोरून महाविकास आघाडीचा पाठिंबा घेत शुभांगी पाटीलही अपक्षच रिंगणात आहेत. पहिल्या फेरीपासून अटीतटीच्या लढतीत सध्या सत्यजीत तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तांबे यांना 15 हजार 784 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना पहिल्या फेरीत 7 हजार 862 मते मिळाली आहेत. मतमोजणी सध्या सुरू आहे.
अमरावती विभाग : अमरावती विभागाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे-भाजपचे रणजीत पाटील यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धीरज लिंगाडे 1349 मतांनी आघाडीवर आहेत. तर रणजीत पाटील तिसऱ्या फेरीतही पुन्हा पिछाडीवर गेले आहेत. तिसऱ्या फेरीत धीरज लिंगाडे यांना 34945 मते मिळवली आहेत. तर, भाजपचे रणजीत पाटील यांना 33596 मते मिळाले आहेत. तर तिसऱ्या फेरीत धीरज लिंगाडे 1349 मतांनी आघाडीवर घेतली आहे. आता चौथ्या फेरीची मेमोजणी सुरु आहे.
नागपूर विभाग : नागपूर विभागात शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडवाले हे विजयी झाले आहेत. एकूण 34 हजार 360 मत आहेत. यामध्ये सुधाकर अडबाले यांना 16, 700 मतं मिळाली, तर भाजपचे नागो गाणार यांना 8211 मतं मिळाली आहेत. तर, 1409 मत अवैध ठरली आहेत. कोटा 16477 मतांचा असताना सुधाकर अडबाले यांना 16700 मते मिळाली आहेत. त्यामुळे ते पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले आहेत.
औरंगाबाद विभाग : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना विजय मिळाला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांच्या विजयानंतर औरंगाबादमध्ये जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. या मतदारसंघात खरे तर तिहेरी लढत होती. राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि सूर्यकांत विश्वासराव यांच्यामध्ये चुरसीचा सामना पाहायला मिळाला. विक्रम काळे यांनी 20195 मते मिळवून या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर, भाजपच्या किरण पाटील यांना 13570 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी भाजपच्या पाटलांपेक्षा अधिक म्हणजेच 13604 मते मिळवली आहेत.
कोकण विभाग : कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला आहे. म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची जवळपास २० हजार मते मिळाली आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे - 20683 मते मिळाली आहेत. बाळाराम पाटील यांना 10997 मत मिळाली आहेत. एकूण मतदान 35069 मतदारन असून मोजली गेलेली मते 33450 मत आहेत.
हेही वाचा : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?; कॅप्टन म्हाणाले, मला काहीही...