ETV Bharat / state

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते, ते कुठेही जाणार नाहीत  - संजय राऊत - विधानसभा निवडणूक महाराष्ट्र

शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी मंगळवारी दावा केला की, त्यांचा पक्ष, काँग्रेसची महाविकास आघाडी (मविआ) ही आता निवडणुका झाल्या तर 'मविआ' महाराष्ट्रात किमान 40 लोकसभा आणि विधानसभेच्या 180-185 जागा जिंकेल. राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्ष किमान 110 जागा गमावेल, असा दावा त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. तसेच अजित पवार यांना राष्ट्रवादीतच चांगले भविष्य असून ते कुठेही जाणार नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut On Election Poll
राऊत
author img

By

Published : Apr 18, 2023, 10:16 PM IST

Updated : Apr 20, 2023, 4:31 PM IST

मुंबई: हा 'कमळ' चा हंगाम नाही. आज बाजारात मला एकही कमळ दिसत नाही. बाजारात इतरही अनेक फुले आहेत आणि लवकरच तुम्हाला इतरही अनेक फुले दिसतील, असे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भोवती असलेल्या अटकळींबद्दल राऊत म्हणाले की, पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याचे वृत्त खोटे आहे.

'त्या' अफवांना पूर्णविराम: 'ऑपरेशन क्लॉक', 'ऑपरेशन टॉर्च' असू शकते किंवा पंजा (काँग्रेसचे चिन्ह) तसेच, राजकारणात काहीही शक्य आहे, असे संजय राऊ म्हणाले. इतर पक्षांच्या आमदारांची शिकार करण्याच्या भाजपच्या कथित प्रयत्नांना विरोधकांनी यापूर्वी 'ऑपरेशन लोटस' असे संबोधले आहे. अजित पवारांबद्दल हेतुपुरस्सर अफवा पसरवण्यात आल्या होत्या; परंतु आता त्यांना 'पूर्णविराम' लावण्यात आला आहे, असे राऊत म्हणाले.

युती वाचवणे हे आमचे कर्तव्य : सत्तेत असलेले लोक आता डळमळीत जमिनीवर आहेत आणि म्हणूनच ते एमव्हीएमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु युतीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. राकॉंच्या अंतर्गत मुद्द्यांबाबत अजित पवार यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, आम्ही 'मविआ'चे रक्षक आहोत आणि युती वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे.

2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने आशादायी चित्र: 2024 च्या निवडणुकीत देशात शंभर टक्के परिवर्तन झालेले असेल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते 14 एप्रिल रोजी मुंबईत आपल्या निवासस्थानी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने आशादायी चित्र असल्याचे राऊत म्हणाले. तर खासदार संजय राऊत यांच्या रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर देखील टीका होत आहे. याला आता खासदार राऊत यांनी उत्तर दिले आहे.

निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी: राज्यात सर्वच पक्ष आगामी 2024 च्या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष व प्रादेशिक पक्ष सध्या एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राहुल गांधी यांची दिल्लीत भेट झाली. आता राहुल गांधी हे मुंबईत मातोश्रीवर येऊन आगामी रणनीतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षाच्या या तयारीवर भाजपकडून टीका केली जात आहे.

हेही वाचा: Amol Mitkari On CM : शिंदे-फडणवीस सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; आमदार अमोल मिटकरींची मागणी

Last Updated : Apr 20, 2023, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.