मुंबई : मुंबईतील वरळी परिसरात राजन दास नावाच्या 42 वर्षीय व्यक्तीला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. सचिन कावंडर, सदा कावंडर आणि भावेश साळवे या तीन आरोपींना वरळी पोलिसांनी अटक केली. आरोपीचे पीडितबरोब वैयक्तिक वैर असल्याचे निष्पन्न झाले. भारतीय दंड संविधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला पैशांची ऑफर देत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या व्यक्तीची पतीसह तिघांनी हत्या केली. वरळीमध्ये घडलेल्या या हत्याकांडाप्रकरणी गुन्हा दाखल करुन वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.सचिन कावंडर, भावेश साळवे आणि सदा कावंडर या तिघांना अटक करण्यात आली आहे.
शरीर सुखाची मागणी : वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. या तरुणाला नायर रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना दाखल पूर्व मृत घोषीत केले. घटनेची नोंद करुन पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. यातील मृत रंजन दास याने आरोपी सचिन कावंडर याच्या पत्नीला ५०० रुपये देऊन शरीर सुखाची मागणी केली होती.
डोक्यात घातला दगड : पत्नीने ही बाब सचिनला सांगितली. सचिनने रंजनला याचा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर सचिन याच्यासह सदा आणि भावेश साळवे यांनी रंजन याला गळ्याला पकडून सिमेंटच्या फ्लेवर ब्लॉकवर ढकलून दिले. तसेच, भावेश याने त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करुन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर वरळी पोलिसांनी या घटनेतील तीन आरोपींना अटक केली आहे.
- हेही वाचा -