ETV Bharat / state

दादर मंडईमध्ये पायाने धुतले जाते गाजर; व्हिडिओ व्हायरल होताच पालिकेची कारवाई - दादर मंडई

काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात पाय धूत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच दादर येथील पालिकेच्या क्रांतीसिंह पाटील मंडईमधील पायाने गाजर धुतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

दादर मंडईमध्ये पायाने गाजर धुणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
author img

By

Published : Aug 14, 2019, 10:21 PM IST

मुंबई - दादर येथील पालिकेच्या मंडईमधील गाजर विक्रेते पायाने गाजर धूत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याची गंभीर दखल पालिकेच्या बाजार विभागाने घेतली आहे. विक्रेत्यांकडून २० ड्रम पालिकेने जप्त केले आहेत. तसेच या प्रकरणी अकरा गाळेधारकांना नोटीस बजावून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दादर मंडईमध्ये पायाने गाजर धुणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात धूत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच दादर येथील पालिकेच्या क्रांतीसिंह पाटील मंडईमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती ड्रममध्ये गाजर धुताना दिसत आहे. त्याला एक व्यक्ती गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलट प्रश्न गाजर धुणाऱ्याने विचारला होता.
हा व्हिडिओ ईदच्या दिवशीचा असल्याने त्या दिवशी पालिकेचे अधिकारी विशेष कामासाठी नेमण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी (१३ ऑगस्टला) पालिकेच्या बाजार विभागाचे अधिकाऱ्यांनी मंडईत जाऊन गाळा क्रमांक ८९, ८७, ८१, ८३ यांना नोटीस बजावली. तसेच अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर १४ ऑगस्ट रोजी पुन्हा याच ठिकाणी जाऊन ४७, ६०, ५५, ६६, १२९, १७३, १८६ या सात गाळेधारकांकडून अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Intro:मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात लिंबू पाणी सरबत बनवताना त्यात हात पाय धुवत असल्याचे समोर आले होते. हा प्रकार ताजा असतानाच दादर येथील पालिकेच्या मंडईमधील गाजर विक्रेते पायाने गाजर धूत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याची गंभीर दखल पालिकेच्या बाजार विभागाने घेतली आहे. विक्रेत्यांकडून २० ड्रम पालिकेने जप्त केले आहेत. अकरा गाळेधारकांना नोटिस बजावून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. Body:काही महिन्यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकात एक सरबत विक्रेता सरबतमध्ये हात पाय धूत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर त्या स्टॉल विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच दादर येथील पालिकेच्या क्रांती सिंह पाटील मंडईमध्ये एक व्यक्ती एका ड्रममध्ये गाजर धुताना दिसत आहे. त्याला एक व्यक्ती गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेले गाजर खाणार का? असा उलट प्रश्न गाजर धुणाऱ्याने विचारला होता. हा व्हिडीओ ईदच्या दिवशीचा असल्याने त्या दिवशी पालिकेचे अधिकारी विशेष कामासाठी नेमण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी (१३ ऑगस्टला) पालिकेच्या बाजार विभागाचे अधिकारी या मंडईत जाऊन गाळा क्रमांक ८९, ८७, ८१, ८३ यांना नोटिस बजावली. तसेच अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर १४ ऑगस्ट रोजी पुन्हा याच ठिकाणी जाऊन ४७, ६०, ५५, ६६, १२९, १७३, १८६ या सात गाळेधारकांकडून अस्वच्छता पसरवल्याबाबत प्रत्येकी एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असून नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच गाजर धुण्याचे १९ ड्रम आणि एका छोटा ड्रम जप्त केला आहे. सध्या या मंडईमध्ये पायाने गाजर धुण्याचे बंद असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

सोबत गाजर पायाने धुतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.