मुंबई - शहरात गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची ( Measles Patients In Mumbai ) संख्या झपाट्याने वाढत आहे. पालिकेच्या २४ पैकी १८ विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत गोवरचे रुग्ण आढळून येत होते. मात्र मंगळवारी निश्चित निदान झालेल्या एकाही रुग्णाची नोंद (Mumbai Municipal Corporation Success blocking To Measles Patients ) झालेली नाही. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण ४६२ रुग्णांची तर ४९७९ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत गोवरमुळे १६ बालकांचा मृत्यू ( 16 Child Died Due To Measles In Mumbai ) झाला आहे. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहेत.
२३ रुग्ण ऑक्सीजनवर, १ व्हेंटिलेटरवर - मुंबईत ८२ लाख ७ हजार ४१४ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ४९७९ संशयित रुग्ण ( Measles Patients In Mumbai ) आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ४६२ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३४५ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १३३ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. १६४ जनरल बेडपैकी १०५, १४६ ऑक्सीजन बेड ( Oxygen Bed In Mumbai Hospital ) पैकी २३, ३५ आयसीयु बेडपैकी ५ बेडवर रुग्ण आहेत. १९ व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
मुलांचे लसीकरण - आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २३ हजार ९९५ मुलांचे लसीकरण ( Child Vaccination In Mumbai ) करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ३५ हजार ८७८ मुलांपैकी ३७,६२७ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ९ महिन्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण १० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी ११७२ बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.
मुंबईतील १३ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १६ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १३ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १३ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू ( 16 Child Died Due To Measles In Mumbai ) गोवरमुळे झाला आहे. ५ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक ( Death Audit Committee Meeting ) आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
महापालिकेने केल्या या उपाययोजना - गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून अॅटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अॅनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालयात भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ( Municipal Corporation Health Officer ) मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.