ETV Bharat / state

गेल्या २२ वर्षांत न होऊ शकलेले परळ टर्मिनस केवळ ५ वर्षांत तयार केले - रेल्वे मंत्री - railway minister

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या ५ वर्षांत मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

रेल्वे मंत्री पियुष गोयल
author img

By

Published : Mar 3, 2019, 11:27 PM IST

मुंबई - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या ५ वर्षांत मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध सोयी सुविधांचे आज उद्घाटन करण्यात आले. गेल्या २२ वर्षांत न होऊ शकलेले परळ टर्मिनस ५ वर्षांत तयार केले असल्याचे, गोयल यावेळी म्हणाले.

परळ टर्मिनसचे उद्घाटन पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २०१३-१४ मध्ये केवळ ६५० किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. मात्र, गेल्या ४ वर्षात याच्या दहापट म्हणजेच ६ हजार किलोमीटर विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे गोयल म्हणाले.
पुणे-नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रेस, मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १५ डब्याच्या अतिरिक्त २ गाड्या, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ तसेच बदलापूर स्टेशनची सुधारणा या कामाची पायाभरणी यावेळी करण्यात आली.

पियुष गोयल काय म्हणाले -

  • २०१४ मध्ये फक्त ३ लिफ्ट होत्या, सध्या ७८ लिफ्ट लागल्या आहेत. तर भविष्यात १७० लिफ्ट लागणार आहेत. वर्तमानात १६ लिफ्ट बसवण्याचे काम सुरू आहे.
  • २०१४ मध्ये फक्त १६ सरकते जिने होते, आता ११२ सरकते जिने बसवण्यात आले आहे. तर सध्या ३८ सरकते जिन्याचे काम सुरू आहे.
  • उपनगरीय मार्गावरील स्थानकात २०१४ पर्यँत ३२० पादचारी पुल होते. तर २०१४ नंतर ३२० पादचारी पूल बसवण्यात आले. तर सध्या १३० पादचारी पूलांचे काम सुरू आहे.
undefined

पियुष गोयल यांनी 'या' रेल्वेच्या सुविधांचे केले लोकार्पण -

  • पेण-थळ व जसई-उरण विद्युतीकृत लाइन
  • कुर्ला, शिव, दिवा, गुरू टेग बहादूर नगर, महालक्ष्मी, पालघर स्थानकावर पादचारी पूल
  • लोणावळा, इगतपुरी स्थानकाचा पुनर्विकास
  • नेरळ-माथेरान गाडीमध्ये विस्टाडोम कोच

'या' कामांना देण्यात आली मंजुरी -

  • कल्याण-मुरबाड नवीन रेल्वे मार्ग
  • अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली इथे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकात १८० अतिरिक्त सरकते जिने

Intro:मुंबई उपनगरीय रेल्वे कामाचा रेल्वेमंत्र्यांनी मांडला लेखाजोगा
मुंबई - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या पाच वर्षांत मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडला. गेल्या 22 वर्षांत न होऊ शकलेलं परळ टर्मिनस पाच वर्षांत तयार करण्यात आल्याचे गोयल म्हणाले. रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेल्वेच्या विविध सोयी सुविधांचे आज उदघाटन करण्यात आलं. यात महत्वाचे म्हणजे परळ टर्मिनसचे उदघाटन करण्यात आले. परळ टर्मिनसवरून पहिल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवून ती कल्याणच्या दिशेला रवाना करण्यात आली. Body:2013-14 मध्ये केवळ 650 किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. मात्र गेल्या चार वर्षात याच्या दहापट म्हणजेच 6 हजार किमी विद्युतीकरणाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली.
2014मध्ये फक्त 3 लीफ्ट, सध्या 78 लीफ्ट लागल्या तर 170लीफ्ट लागणार आहे. तर वर्तमानात 16 लीफ्ट बसवण्याचे काम सुरु आहे.
2014मध्ये फक्त 16 सरकते जिने तर 2014 नंतर 112 सरकते जिने
लागले. सध्या 38 सरकते जिन्याचे काम सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकात 180 अतिरिक्त सरकते जिने बसविण्यास मंजुरी देण्यात आली. उपनगरीय मार्गावरील स्थानकात
2014 पर्यँत 320 पादचारी पुल तर 2014 नंतर 320 पादचारी पूल बसवण्यात आले. तर सध्या 130 पादचारी पूलांचे काम सूरु आहे.
Conclusion:यासोबत पुणे नागपूर साप्ताहिक हमसफर एक्सप्रेस,मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 15 डब्याच्या अतिरिक्त 2 गाड्या, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ तसेच बदलापूर स्टेशनची सुधारणा त्याच सोबत या कामाची पाया भरणी करण्यात आली.

या रेल्वेच्या सुविधांचे करण्यात आले लोकार्पण

-पेण-थळ व जसई-उरण विद्युतीकृत लाइन

-कुर्ला,शिव,दिवा,गुरू टेग बहादूर नगर,महालक्ष्मी,पालघर स्थानकावर पादचारी पूल.

-लोणावळा,इगतपुरी स्थानकाचा पुनर्विकास

-नेरळ-माथेरान गाडी मध्ये विस्टाडोम कोच

या कामांना देण्यात आली रेल्वेची मंजुरी

-कल्याण-मुरबाड नवीन रेल्वे मार्ग

-अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली इथे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक

-मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकात 180 अतिरिक्त सरकते जिने
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.