ETV Bharat / state

बाय-बाय एमयूटीपी; 15 वर्षानंतर 639 एमयूटीपी बस इतिहासात जमा  

author img

By

Published : Jun 13, 2021, 6:57 PM IST

एमयूटीपी बसला 15 वर्षे पूर्ण झाले. आतापर्यत 644 बसगाड्यांपैकी तब्बल 639 बसगाड्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. तसेच येत्या 18 जूनपर्यत एमयूटीपीच्या उर्वरित बसेस सुद्धा बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे याबसेसचा निरोप सोहळा बेस्टच्या बस प्रेमीकडून नुकताच पार पडला.

बाय-बाय एमयूटीपी; १५ वर्षानंतर 639 एमयूटीपी बस इतिहासात जमा  

मुंबई - संपूर्ण भारतातील सर्वात चांगली बस सेवा म्हणून बेस्टची ओळख आहेत. बेस्टमध्ये आज जवळ जवळ साडे तीन हजार बसेसचा ताफा आहे. या बस ताफ्यातील सर्वाधिक आकर्षक आणि आवडते माॅडेल हे एमयूटीपी आहे. एमयूटीपी बसला 15 वर्षे पूर्ण झाले. आतापर्यत 644 बसगाड्यांपैकी तब्बल 639 बसगाड्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. तसेच येत्या 18 जूनपर्यत एमयूटीपीच्या उर्वरित बसेस सुद्धा बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुळे या बसेसचा निरोप सोहळा बेस्टच्या बसप्रेमीकडून नुकताच पार पडला.

639 बसगाड्या आतापर्यंत बेस्टच्या सेवेतून
बेस्टने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या बस ताफ्यात 2005 साली मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्प्याने एमयूटीपी बस समाविष्ट झालेल्या होत्या. ही बस अशोक लेलॅंडच्या सेमी लो फ्लोवर एमयूटीपी बस माॅडेल बेस्ट बसप्रेमींचे सर्वाधिक आवडते आहे. या माॅडेलच्या बस गाड्यांना बेस्टच्या सेवेत 15 वर्ष पूर्ण झालीत. त्यामुळे 644 बस गाड्यांपैकी तब्बल 639 बसगाड्या आतापर्यंत बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. याच एमयूटीपी प्रकारातील मलाड आगाराच्या बस ताफ्यातील 2638 (एमएच 01 एलए 5851) ही शेवटची प्रवासी वाहतूक करणारी एमयूटीपी बस 18 जून रोजी बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहे. अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी ‘ईटीव्ही भारत’ला दिली आहे.

बसचालक, बसवाहकाचा सत्कार -
लाडक्या बस मॉडेलची आठवण कायम राहण्यासाठी 'आपली बेस्ट आपल्याचसाठी' या प्रवासी संस्थेने बेस्ट उपक्रमाकडून रितसर परवानगी घेऊन या बसचा शेवटचा प्रवास हा बसमार्ग क्रमांक 458 मर्यादित, मलाड आगार ते महाराणा प्रताप चौक, मुलुंड (प.) या बस मार्गावर आयोजित केला. त्यानुसार, 'आपली बेस्ट आपल्याचसाठी' या प्रवासी संस्थेने स्वखर्चातून 9 जून रोजी फुलांनी सजवून तिच्या शेवटच्या प्रवासात एक प्रवासी म्हणून सहभाग घेतला. संस्थेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी सांगितले की, मुंबईकरांना कोणत्याही संकटात सुरक्षितस्थळी पोहचविणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्याप्रति सामाजिक भान ठेवत संस्थेच्यावतीने बस मार्गावर कर्तव्यावर उपस्थित असलेल्या बसचालक, बसवाहकाचा सत्कार करण्यात आला. बेस्ट बसचालक जगदीश केळस्कर हे येत्या 1 ऑगस्ट रोजी बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना बस चालविण्याचा मान देण्यात आला.

३ हजार २५८ बसेसचा ताफा
सध्या बेस्ट उपक्रमामध्ये डबल डेकर ४८, सिंगल डेकर १ हजार ४५७, मिनी मिडी बसेस ४६६, हायब्रीड बसेस २५, इलेक्ट्रिक बसेस ६ आणि भाडेतत्वावरील १ हजार २५६ अशा एकूण ३ हजार २५८ बसेसचा ताफा आहेत. तसेच बेस्ट उपक्रमामधील मानाचा तुरा असलेल्या डबल डेक्कर बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने मागच्या वर्षी घेतला आहे. त्यासाठी बेस्टकडून अत्याधुनिक शंभर डबल डेकर बस खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.