ETV Bharat / state

Jumbo Covid Center : मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर लवकरच होणार कार्यान्वित - खासदार राहुल शेवाळे चुनाभट्टी कोविड सेंटर भेट

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे चुनाभट्टी येथील जंबो कोविड सेंटर ( Jumbo Covid Center ) लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी या कोविड सेंटरची पाहणी केली. ( MP Rahul Shevale Visited Chunabhatti Covid Center )

Mumbai's first fully oxygen-equipped Jumbo Covid Center will be start soon
खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी या कोविड सेंटरची पाहणी केली
author img

By

Published : Jan 1, 2022, 2:29 AM IST

मुंबई - देशभरात ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे चुनाभट्टी येथील जंबो कोविड सेंटर ( Oxygen Equipped Jumbo Covid Center ) लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी शुक्रवारी या कोविड सेंटरची पाहणी केली. ( MP Rahul Shevale Visited Chunabhatti Covid Center )

माध्यमांशी बोलताना खासदार राहुल शेवाळे

चुनाभट्टी येथील सोमैया ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच्या सर्व 1200 खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा आहे. याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. म्हाडाच्या वतीने उभारण्यात आलेले हे सेंटर येत्या 15 दिवसांत सुरू होणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली.

हेही वाचा - Corona Cases Hike in Maharashtra : राज्यात दिवसभरात ८ हजार ६७ नवे कोरोनाबाधित, तर ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण

विशेष विभाग सुरू करण्यात येणार -

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन चुनाभट्टी येथील सोमैया ट्रस्टच्या सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत म्हाडाच्या वतीने हे जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे यातील 1200 खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा असून याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. सुमारे 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत एकूण 8 युनिट असणार आहेत. 940 कोटी रुपये खर्च करून म्हाडाच्या वतीने हे सेंटर उभारण्यात आले. याच ठिकाणी सुमारे 40 किलो लिटर क्षमतेचा लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन प्लांट असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.