ETV Bharat / state

मुंबईकरांनो गणेशोत्सवादरम्यान काळजी घ्या, हे दहा पुल आहेत धोकादायक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील अनेक धोकादायक असलेल्या पुलांवर रहदारीसाठी आणि गणेशोत्सवादरम्यान गर्दी करून मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे.

ganeshotsav
ganeshotsav
author img

By

Published : Sep 2, 2021, 5:48 AM IST

मुंबई - अंधेरी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील अनेक धोकादायक असलेल्या पुलांवर रहदारीसाठी आणि गणेशोत्सवादरम्यान गर्दी करून मिरवणुका काढण्यास बंदी घातली आहे. यंदा पालिकेने दहा पुलांची यादी जाहीर केली असून गणेशमूर्तीचे आगमन किंवा विसर्जन करताना गर्दी करू नये, लाऊडस्पिकरचा वापर करू नये आणि पुलावर जास्त वेळ थांबू नये, असे निर्देश पालिकेने दिले आहेत.

९ जणांचा झाला मृत्यू -

अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून २ जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ अशा ९ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३५० पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी आठवडाभर आधीच धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी, असेही निर्देश पालिकेने दिले आहेत.

१६ टनांपेक्षा जादा भार नको -

कोरोना काळामुळे सलग दुसर्‍या वर्षी गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीवर बंदी असली तरी लालबाग-परळ अशा दक्षिण मध्य भागातून निघणार्‍या सार्वजनिक गणपतींच्या आगमन-विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये पुलावर गर्दी करू नये आणि एका वेळी भाविकांचे व वाहनांचा मिळून १६ टनांपेक्षा जादा भार पडणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.

मध्य रेल्वेवरील धोकादायक पूल -

  • घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
  • करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
  • आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रीज
  • भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक पूल -

  • मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
  • सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
  • केनडी रेल ओव्हर ब्रीज
  • फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज
  • बेलासीस मुंबई सेंट्रल जवळील ब्रीज
  • महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
  • प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
  • दादर-टिळक रेल ओव्हर ब्रीज
  • अंधेरी स्टेशनजवळील गोखले रेल्वे ब्रीज

हेही वाचा - अभिनेत्री गहना वशिष्ठच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.