ETV Bharat / state

मुंबईकरांना एसी लोकल नको; ई - सर्वेक्षणात 37 हजार नागरिकांनी नोंदवले मत

पश्चिम रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या तिन्ही मार्गावरील एसी लोकल अत्यंत्य अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या सर्वेक्षणात ३७ हजार ८२ नागरिकांनी आपले मत नोंदविले आहे.

Mumbaikars don't want AC local
मुंबईकरांना एसी लोकल नको
author img

By

Published : Jul 27, 2021, 8:31 AM IST

मुंबई - गेल्या वर्षी मध्य रेल्वेवर पहिली ट्रान्सहार्बर मार्गावर आणि दुसरी एसी लोकल मुख्य मार्गावर धावायला सुरुवात झाली होती. मात्र, या एससी लोकलला अत्यंत कमी प्रतिसाद असल्याने प्रवासी वाढवण्यासाठी थेट जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी रेल्वेने एसी लोकल संबंधित ई-सर्वेक्षण सुरु केले होते. या सर्वेक्षणात ३७ हजार ८२ नागरिकांनी आपले मत नोंदविले आहे. ज्यामध्ये ४० टक्के प्रवाशांनी साध्या बारा लोकल डब्ब्यांपैकी तीन डब्बे एसी आणि ९ डब्बे साधे असावेत असे मत नोंदवले आहे. तर ३० टक्के प्रवाशांनी १५ लोकल डब्ब्यांपैकी ६ डब्बे एसी आणि ९ डब्बे साधे हवे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पूर्ण एसी लोकल नकोत अशी सर्वेक्षणातून बाब उघड होत आहे.

३७ हजार मुंबईकरांनी घेतला सहभाग -

पश्चिम रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या तिन्ही मार्गावरील एसी लोकलला अत्यंत्य अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे एसी लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी प्रवासी सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार ऑफ लाईन आणि ऑनलाईन सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले होते. प्रवाशांच्या अडचणी मांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर प्रतिनिधींची नेमणूक सुद्धा करण्यात आली होती. तरीही प्रवाशांची संख्या वाढली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एसी लाेकलबाबत नेमके काय वाटते याची माहिती जाणून घेण्यासाठी जून महिन्यापासून आनलाईन सर्वेक्षण सुरु केले. सुमारे महिन्याभर चाललेल्या या सर्व्हेक्षणात ३७ हजार ८२ जणांनी भाग घेतला. यात मध्य रेल्वेवरील ११ हजार ७४३ तर २५ हजार ३३९ पश्चिम रेल्वेवरील प्रवासी आहे.

मुंबईकरांना हवी सेमी एसी लाेकल -

या सर्व्हेक्षणात संपुर्ण एसी लाेकल हवी की सेमी एसी लाेकल, सेमी एसी लाेकलमध्ये किती डब्बे एसी आणि साधे हवेत, एसी लाेकलचे तिकिटदर कसे असावेत असे प्रश्न विचारले हाेते. या सर्व्हेक्षणात सेमी एसी लाेकलकडेच प्रवाशांचा कल असल्याचे दिसून येत आहे. ४० टक्के प्रवाशांनी साध्या बारा लोकल डब्ब्यांपैकी तीन डब्बे एसी आणि ९ डब साधे असावेत असे मत नोंदवले आहे. तर ३० टक्के प्रवाशांनी १५ लोकल डब्ब्यांपैकी ६ डबे एसी आणि ९ डबे साधे हवे, अशी सूचना केली आहे. याशिवाय बारा लोकल डब्ब्यांपैकी प्रत्येकी सहा डबेही एसी करण्यास सांगितले आहे.

रेल्वे बाेर्ड घेणार निर्णय -

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकुर यांनी सांगितले की, ७० टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे भाडे हे सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी भाडेदराच्या फक्त दहा टक्के अधिक करण्याची मागणी केली आहे. पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेवरील एसी लोकलबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे. अहवालातील प्रवाशांची मते पाहून एसी, सेमी एसी लाेकल आणि तिकिटदराबाबत रेल्वे बाेर्ड अंतिम निर्णय घेणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.