मुंबई - दिवाळीच्या दिवसात रांगोळी, फटाके, फराळाबरोबरच 'दिवाळी पहाट' या सांगीतिक मैफलींची रेलचेल असते. मुंबई शहर आणि उपनगरांतील रसिकांसाठी दिवाळी आणि ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे एक अतूट नाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक संस्था आणि संघटनांकडून दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अनेक वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची परंपरा सुरू असून त्याला रसिकांचा भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. भावगीत, चित्रपट गीत, नाटय़संगीत, शास्त्रीय गायन आणि वादन असे प्रकारांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा करुन अनेक रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
हेही वाचा - पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत फुले फेकण्याची वेळ
मुंबईत गिरगाव मराठमोळा भाग म्हणून ओळखला जातो. गिरणगावात ढोल ताशांच्या गजरात दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. दादर येथे शिवाजी पार्क मैदानात कॉलेज तरुणाईने एकत्र येवून दिवाळी पहाट साजरी केली.