ETV Bharat / state

इंधन दरवाढ : मुंबई युवक काँग्रेसकडून भाजप प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन - इंधन दरवाढ न्यूज

मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे दरवाढ केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं.

इंधन दरवाढ : मुंबई युवक काँग्रेसकडून भाजप प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन

author img

By

Published : Jun 5, 2021, 9:14 PM IST

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलचे दरवाढ केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी पीपीइ किट घालून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलन केले आहे. "मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेची पुन्हा एकदा फसवणूक केली आहे. इंधनाचे दर कमी करावे अन्यथा युवक काँग्रेस यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल", अशा इशारा काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिला आहे.

भाजपचे नेते, कार्यकर्ते मुग गिळून गप्प का बसले आहेत

काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 50 रुपये वरून 55 रुपये झाले होते, त्यावेळी भाजपने देशभरात आंदोलने केली होती. आता त्यांच्याच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर दुप्पटीने वाढवले आहे मग आता भाजपचे नेते, कार्यकर्ते मुग गिळून गप्प का बसले आहेत, असा प्रश्न ही झिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवल्याने या देशातील सर्वसामान्य जनतेवर चालत फिरण्याची वेळ आली आहे म्हणून सरकारचा निषेध करत मोदी सरकारने वाढवलेले दर सर्वसामान्य जनतेला परवडतील असे जाहीर करावे, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

अच्छे दिन तर आलेच नाहीत, उलट बुरे दिन आले

२०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध सोशल मीडिया, मीडियाच्या माध्यमातून जनतेला भूलथापा दिल्या. अच्छे दिन आयेंगे; परंतु अच्छे दिन तर आलेच नाहीत, उलट बुरे दिन आले म्हणून आता जनता टाहो फोडत आहे, असा आराेप यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला़. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर गॅसचे भावदेखील ९०० पर्यंत गेले आहेत. जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यावर पेट्रोल-डिझेल भाववाढीचा परिणाम झाला आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले आहे, असा आराेप करीत यावेळी सरकारविराेधी घाेषणा या आंदोलनात देण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.