ETV Bharat / state

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी खुशखबर! बीएमसीकडून आजपासून १० टक्के पाणीकपात रद्द

पाण्याचा काटकसरीने वापर करणाऱ्या मुंबईकरांना आता दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेने आजपासून 10 टक्के पाणी कपात रद्द केली आहे. मुंबईकरांना पाणी पुरविणाऱ्या धरणांमध्ये जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Water Supply
मुंबई पाणी पुरवठा
author img

By

Published : Aug 9, 2023, 10:38 AM IST

मुंबई : अखेर 39 दिवसांनंतर आजपासून मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. याची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. 9 ऑगस्टपासून पाणी कपात रद्द केल्याची घोषणा करताना चहल म्हणाले की, जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

Mumbai Water Supply
मुंबई महापालिकेची धरणे आणि पाणीसाठा

एकूण पाणीसाठा : मुंबई महापालिकेने 27 जून रोजी केलेल्या निरीक्षणात तलावांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे 1 जुलै 2023 पासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात जाहीर केली होती. 27 जूनपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ 6.97 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. 1 जुलै रोजी पाणी कपात सुरू झाली, तेव्हा तलावांमध्ये 18,5972 एमएलडी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 12.85 टक्के इतका पाणीसाठा होता. बीएमसीने मंगळवारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा तलावांमध्ये 11,78751 एमएलडी पाणीसाठा आहे. हा जलसाठा तलावांच्या एकूण क्षमतेच्या 81.44 टक्के आहे. बीएमसीच्या नियमांनुसार, 30 सप्टेंबर रोजी तलावांमध्ये 1,44,7363 एमएलडी असणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेची धरणे आणि पाणीसाठा : महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमध्ये 8 ऑगस्टला सकाळी 6 वाजेपर्यंत 11,78,751 एमएलडी पाणीसाठा आहे. मोडक सागरमध्ये 1,28,925 एमएलडी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 100 टक्के पाणी होते. अप्पर वैतरणामध्ये 1,46,593 एमएलडी म्हणजेच 64.56 टक्के पाणीसाठा झाला आहे. तानसा तलावात 1,44,711 एमएलडी म्हणजेच 99.75 टक्के पाणीसाठा आहे. तर मध्य वैतरणा येथे 1,86,054 एमएलडी पाणीसाठा जमा झाला आहे. एकूण साठवण क्षमतेच्या 96.14 टक्के आहे. भातसा तलावात 5,36,725 एमएलडी पाणी आहे, ते तलावाच्या एकूण क्षमतेच्या 74.85 टक्के आहे. विहार तलावात 27698 एमएलडी आणि तुळशी तलावात 8046 एमएलडी पाणीसाठा आहे, म्हणजेच दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

विनाअडथळा पाणीपुरवठा : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमध्ये सध्या 11,78,751 एमएलडी पाणी साठले आहे. बीएमसी मुंबईला पुढील 306 दिवसांसाठी म्हणजेच 8 जून 2024 पर्यंत विनाअडथळा पाणीपुरवठा करू शकते. बीएमसी मुंबईला दररोज 3,850 एमएलडी पाणी पुरवते. मात्र, यातील सुमारे 800 एमएलडी पाणी गळती किंवा पाणी चोरी या कारणांमुळे मुंबईकरांपर्यंत पोहोचत नाही. या पाणी गळतीवर महापालिकेने उपाय काढल्यास मुंबईकरांची पाणी समस्येपासून सुटका होईल.

हेही वाचा :

  1. Mumbai Water Supply: मुंबईकरांच्या २४ तास पाण्याचे नेमके झाले काय? मुंबईकरांचे स्वप्न अधुरेच..
  2. Mumbai Water Supply: मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा; पाणी कपात रद्द, 'या' तारखेपासून मुंबईचा पाणी पुरवठा सुरळीत होणार
  3. Mumbai Get Clean Water : मुंबईकरांना स्वच्छ, मुबलक पाणी मिळण्यासाठी उपाययोजना सरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.