ETV Bharat / state

'भूकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं चांगलं'; मुंबईतील भाजीवाल्यांचा लॉकडाऊनला विरोध - मुंबई कोरोना न्यूज

मुंबईतील कांदिवलीच्या पूर्वेकडील भाजी मार्केटमध्ये दररोज लाखो लोक खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, याठिकाणी कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 4, 2021, 2:31 PM IST

Updated : Apr 4, 2021, 3:51 PM IST

मुंबई - शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सतत वाढत आहे. 3 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 9090 नवीन रुग्ण आढळून आले असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. पण तरीही, कोरोनाची भीती मुंबईतील बरयाच भागात दिसून येत नसल्याचे चित्र आहे. कांदिवलीच्या भाजी मार्केटमध्ये नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहे. एवढचं नाही तर सामाजिक अंतर, मास्क याचा वापरही करताना दिसून येत नाहीत.

मुंबईकरांचा लॉकडाऊनला विरोध

नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन

राज्य शासनाकडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याची सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. परिणामी कोरोना संख्येत वाढ होत आहे. तसेच अनेक दुकानदार मास्कचा वापर न करता उघड उघड कायद्याचा भंग करत आहेत.

हेही वाचा - मुख्ममंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता

कांदिवलीच्या भाजी बाजारात कोरोना नियमांचे उल्लंघन

मुंबईतील कांदिवलीच्या पूर्वेकडील भाजी मार्केटमध्ये दररोज लाखो लोक खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, याठिकाणी कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. सोशल डिस्टन्सिंग सोडाच मात्र, अनेकजण मास्कचाही वापर करताना दिसत नाहीत. तसेच मार्केटमधील दुकानदारसुद्धा कोरोना नियम पाळताना दिसून येत नाहीत.

भूकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं चांगलं

कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. मात्र, या लॉकडाऊनला राज्यातील व्यापारी आणि दुकानदार वर्गाने विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊनमुळे आमचे प्रचंड नुकसान होत असून भुकेने आमचा जीव जाईल असे मत व्यापारी वर्गाने व्यक्त केले आहे. कांदिवलीच्या भाजी मार्केटमधील दुकानदारांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मेलेल चांगले, असे मत इथले दुकानदार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू

Last Updated : Apr 4, 2021, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.