मुंबई - मुंबई विद्यापीठाचा २०२० चा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे. या दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून होणार आहे.
हेही वाचा - ग्रामसेवकाची बदली रद्द करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले, बेमुदत उपोषण
विद्यापीठाने घेतलेल्या प्रथम सत्र २०२० च्या पदवी, पदव्युत्तर व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच, जे विद्यार्थी दीक्षान्त समारंभापूर्वी पदवी व पदविका परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तेही पदवी घेण्यास पात्र राहतील. पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येतील. याचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करतील. २०१९ च्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,६८,२३९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावर्षी २ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पदवी प्राप्त करतील.
पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी) नावाचा तपशील विद्यार्थी व महाविद्यालयांना तपासणीसाठी आजपासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या http://muexam.mu.ac.in/convocationstudents/ या संकेतस्थळास भेट देऊन आपल्या पदवीचा तपशील पाहावा, असे कळवण्यात आले आहे.
हेही वाचा - वाहतुकीच्या बाबतीत पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप - अभिनेते विजय पाटकर