ETV Bharat / state

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 584 सायलेंसरवर फिरवला बुलडोझर; मुंबई पोलिसांची कारवाई - मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Traffic police : मुंबईत विविध कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असल्यानं, ध्वनी आणि वायू प्रदूषणात (Air And sound Pollution) वाढ होत आहे. शहरात मॉडिफाइड साइलेंसर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

Mumbai Traffic Police
584 सायलेन्सर जप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 8:42 PM IST

प्रतिक्रिया देताना सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ

मुंबई Mumbai Traffic Police : मुंबईत वाढते वायू ध्वनी प्रदूषण (Air And sound Pollution) लक्षात घेता, पोलिसांच्या वाहतूक विभागानं देखील कारवाईचे कठोर पाऊल उचलले आहे. 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मॉडिफाइड केलेले एकूण 584 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक विभागाने बुलडोझर फिरवला आहे.

41 वाहतूक विभागांकडून कारवाई : मॉडिफाइड केलेले एकूण 584 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. मोटार वाहन अधिनियम कलम 115(7)/177 अन्वये 20946 इतकी पीयुसी संबंधित मोटर वाहन अधिनियम कलम 194(F) प्रमाणे मॉडिफाइड सायलेन्सरवर 714 तसंच मोटर वाहन अधिनियम कलम 188 प्रमाणे अनधिकृत फेरबदल केलेल्या मोटरसायकलींवर 2051 इतक्या दंडाची कारवाई करण्यात आली. याबाबत सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी माहिती दिली. ही एकूण कारवाई मुंबईतील 41 वाहतूक विभागांकडून करण्यात आली आहे. तसेच सर्वाधिक वाहनांवर कारवाई ही पश्चिम उपनगरात करण्यात आली आहे.

244 सायलेन्सर जप्त : 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून वाहतूक विभागाने मॉडिफाइड केलेले एकूण 244 सायलेन्सर जप्त केले. मोटर वाहन अधिनियम कलम 115(7)/177 प्रमाणे 5 हजार 866 इतकी PUC संबंधित मोटर वाहन अधिनियम कलम 194 (f) प्रमाणे मॉडीफायड सायलेन्सरवर 517 त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 198 प्रमाणे, बेकायदेशीरपणे फेरबदल केलेल्या 127 मोटरसायकलवर ई-चलान कारवाई करण्यात आली आहे.

सहा महिन्यांनी तपासणी करावी : वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांनी वाहन चालकांना आवाहन केलं की, मोटर वाहन उत्पादक कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या मोटर सायकल सायलेन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध बदल करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणं कायद्याने विहित केल्याप्रमाणे वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण तपासणी दर सहा महिन्यांनी करावी.

हेही वाचा -

  1. License Canceled For Wrong Side Driving: सावधान! एका दिवसात 104 वाहन चालकांचे लायसेन्स रद्द; 'ही' चूक ठरली कारणीभूत
  2. No Honking Day: हॉर्न वाजविल्यास होणार कारवाई; मुंबई वाहतूक पोलीसांची बुधवारी 'ही' विशेष मोहीम
  3. Fancy Number Plate : फॅन्सी नंबर प्लेट वापराल तर खबरदार, वाहतूक पोलिसांनी उचलला कारवाईचा बडगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.