मुंबई - कोरोनाची दुसऱ्या लाट आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला. यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली. मात्र या काळात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली. 1 मे रोजीपासून ते 31 मे पर्यंत या एका महिन्याच्या काळात मुंबईतील 4 लाख 44 हजार 476 जणांवर वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 12 कोटी 89 लाख 88 हजार 850 कोटींचा दंड ठोठावला आला आहे.
नो पार्किंग किंवा अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या 99 हजार 330 नागरिकांना 1 कोटी 98 लाख 66 हजार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर बिना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 77 हजार 122 नागरिकांना 3 कोटी 85 लाख 61 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय विना परवाना वाहन चालवणाऱ्या 384 वाहन चालकांना 1 लाख 81 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच वाहन चालवत असताना सिट बेल्ट न लावणाऱ्या 6 हजार 685 वाहन चालकांकडून 13 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
बेशिस्तपणे ट्रिपल सिट गाडी चालवणाऱ्या 1 हजार 907 वाहन चालकांना 3 लाख 81 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला. बेशिस्तपणे वेगाने वाहन चालवणाऱ्या 5 हजार 940 वाहन चालकांना 59 लाख 40 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर 2 लाख 53 हजार 108 वाहनचालकांना इतर वाहतूकीचे नियम मोडल्या प्रकरणी 6 कोटी 27 लाख 22 हजार 250 कोटीचा दंड वाहतूक विभागाने आकारला आहे.
हेही वाचा - कारवाईच्या इशाऱ्यानंतरही राजकीय बॅनरबाजी, महापालिकेची कारवाई सुरू
हेही वाचा - मुंबईत 500 लसीकरण केंद्र सुरू होणार, लसीसाठी कंपन्यांसोबत बोलणी सुरू