ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर सज्ज; ७२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - Mumbai Suburban District Poll News

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजे २६ मतदारसंघ मुंबई जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात असणारी मतदार संख्या देखील राज्यात सर्वाधिक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यात ३३ लाख १५ हजार ३३६ स्त्री मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी आहे. तसेच ५२८ इतर मतदार देखील जिल्ह्यात आहेत. यानुसार एकूण मतदार संख्या ही ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी आहे.

भारत निवडणूक आयोग
author img

By

Published : Oct 20, 2019, 8:41 PM IST

मुंबई- महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असा लौकिक असणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात तब्बल ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी मतदार संख्या आहे. सोमवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांना सहभागी होता यावे यासाठी तब्बल ७ हजार ३९७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी सुमारे ६० हजार कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. ही माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आयोजित केलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत दिली आहे. दि. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी ६ वाजेपूर्वी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी बोरीकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे.

मतदार संख्या

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजे २६ मतदारसंघ मुंबई जिल्ह्यात आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात असणारी मतदार संख्या देखील राज्यात सर्वाधिक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यात ३३ लाख १५ हजार ३३६ स्त्री मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ४७ हजार ३८५ एवढी आहे. तसेच ५२८ इतर मतदार देखील जिल्ह्यात आहेत. यानुसार एकूण मतदार संख्या ही ७२ लाख ६३ हजार २४९ एवढी आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७९ हजार २७९ मतदार हे चांदिवली मतदारसंघात आहेत. तर या खालोखाल गोरेगाव मतदारसंघात ३ लाख २७ हजार ८९९ आणि अंधेरी पश्चिम मतदारसंघात ३ लाख ६ हजार २११ एवढी मतदार संख्या नोंदविण्यात आली आहे. तसेच सर्वात कमी म्हणजेच २ लाख ३१ हजार ४७ एवढे मतदार विक्रोळी मतदारसंघात आहेत.

वाहन व्यवस्था

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात एकूण ७ हजार ७१९ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांमध्ये २ हजार ३० स्वयंसेवक कार्यरत असणार असून दिव्यांगासाठी ‘व्हील चेअर्स’ चे नियोजन करण्यात आले आहे.

सखी केंद्र

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या 'स्विप' (SVEEP) कार्यक्रमाची अधिकाधिक परिपूर्ण अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असून मुंबई उपनगर जिल्ह्यात २८ सखी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सर्व २८ सखी केंद्रांचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, ही मतदान केंद्रे केवळ महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित होणार आहेत.

वेबकास्टींग

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ७ हजार ३९७ मतदान केंद्रांपैकी १० टक्के मतदान केंद्रांवर म्हणजेच ७४१ मतदान केंद्रांवरील कार्यवाहीचे वेबकास्टींग (Live Webcasting) केले जाणार आहे. या मतदान केंद्रांवरील घडामोडींचे वेबकास्टींग करण्यात येणार असून या माध्यमातून तेथील घडामोडींवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे.

मतदान केंद्रात जाताना मतदारांना भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नाही

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रात भ्रमणध्वनी संच (Mobile / Cellular Phone) आणण्यास व वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या सोमवारी, म्हणजेच दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी मतदारांनी त्यांच्यासोबत भ्रमणध्वनी आणू नये, असे निवडणूक आयोगाकडून निर्देश देण्यात आले आहे.

वैध मतदार ओळखपत्रासह १२ ओळखपत्रांचे पर्याय ओळख पटविण्यासाठी ग्राह्य

भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या ११ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. या ११ ओळखपत्रांमध्ये १) पारपत्र (पासपोर्ट), २) वाहन चालक परवाना (Driving License), ३) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनीने दिलेले ओळखपत्र), ४) बँक किवा पोस्ट ऑफिसद्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक, ५) पॅनकार्ड, ६) नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत 'रेसिस्टेंस जीन आइडेंटीफायर' (RGI) द्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड, ७) मनरेगा कार्यपत्रिका, ८) कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ९) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, १०) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, ११) आधारकार्ड यांचा समावेश आहे.

Intro:मुंबई
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असा लौकिक असणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदार संघ ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019’ करिता सज्ज झाले आहेत. या जिल्ह्यात तब्बल 72 लाख 63 हजार 249 एवढी आहे. सोमवारी l होणा-या मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी 7 हजार 397 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी सुमारे 60 हजार कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. तर याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दला व केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. Body:दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ असून सायंकाळी 6 वाजेपूर्वी मतदान केंद्राबाहेरील मतदान रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. तरी अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी बोरीकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे.

मतदार संख्या
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक म्हणजे 26 मतदार संघ असणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यात असणारी मतदार संख्या ही देखील राज्यात सर्वाधिक आहे. ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019’ साठी या जिल्ह्यात 33 लाख 15 हजार 336 स्त्री मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 39 लाख 47 हजार 385 आहे. तसेच 528 इतर मतदार देखील या जिल्ह्यात आहेत. यानुसार मतदार एकूण मतदार संख्या ही 72 लाख 63 हजार 249 एवढी आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 3 लाख 79 हजार 279 मतदार हे चांदिवली मतदार संघात आहेत. तर या खालोखाल गोरेगांव मतदार संघात 3 लाख 27 हजार 899 आणि अंधेरी पश्चिम मतदार संघात 3 लाख 6 हजार 211 एवढी मतदार संख्या नोंदविण्यात आली आहे. तसेच सर्वात कमी म्हणजेच 2 लाख 31 हजार 47 एवढे मतदार विक्रोळी मतदार संघात आहेत.

वाहन व्यवस्था
मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदार संघात एकूण 7 हजार 719 दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रांमध्ये 2 हजार 30 स्वयंसेवक कार्यरत असणार असून ‘व्हील चेअर्स’चे नियोजन करण्यात आले आहे.

सखी केंद्र
‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019' च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार मतदान प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी राबविण्यात येणा-या 'स्वीप' (SVEEP) कार्यक्रमाची अधिकाधिक परिपूर्ण अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु असून मुंबई उपनगर जिल्ह्यात 28 सखी मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सर्व 28 सखी केंद्रांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ही मतदान केंद्रे केवळ महिला कर्मचा-यांद्वारे संचालित होणार आहेत.

वेबकास्टींग
मुंबई उपनगर जिल्ह्यातील 7 हजार 397 मतदान केंद्रांपैकी 10 टक्के मतदान केंद्रांवर म्हणजेच 741 मतदात केंद्रांवरील कार्यवाहीचे वेबकास्टींग (Live Webcasting) केले जाणार आहे. या मतदान केंद्रांवरील घडामोडींचे बेबकास्टिंग करण्यात येणार असून यामाध्यमातून तेथील घडामोडींवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे.

मतदान केंद्रात जाताना मतदारांना भ्रमणध्वनी नेण्यास परवानगी नाही
मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रात भ्रमणध्वनी संच (Mobile / Cellular Phone) आणण्यास व वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यात येत्या सोमवारी, म्हणजेच दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या दरम्यान होणा-या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी येताना मतदारांनी त्यांच्या सोबत भ्रमणध्वनी आणू नयेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी मतदान केंद्रात येताना सोबत भ्रमणध्वनी संच असणार नाही,याची परिपूर्ण दक्षता घ्यावी.

वैध मतदार ओळखपत्रासह 12 ओळखपत्रांचे पर्याय ओळख पटविण्यासाठी ग्राह्य
'मा.भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या 11 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे गरजेचे आहे. या 11 ओळखपत्रांमध्ये 1) पारपत्र (पासपोर्ट), 2) वाहन चालक परवाना (Driving License), 3) छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनीने दिलेले ओळखपत्र), 4) बँक किंवा पोस्ट ऑफिस द्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक, 5) पॅनकार्ड, 6) नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत 'रेसिस्टेंस जीन आइडेंटिफायर' (RGI) द्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड, 7) मनरेगा कार्यपत्रिका, 8) कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 9) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, 10) खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, 11) आधारकार्ड यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आचारसहिंता कालावधीत रु. १०.३६ कोटींची रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त

राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०१९ च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता अमंलबजावणी काळात निवडणूक आचारसंहिता भंग , सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणांत १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, भरारी पथकांमार्फत करण्यात आलेल्या २१ प्रकरणांत रु १०.३६ कोटींची रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील ५१२९ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.
आचारसंहिता भंग , सामाजिक शांतता भंग व इतर प्रकरणांत दाखल करण्यात आलेल्या १४ गुन्ह्यांपैकी ३ अदखल पात्र गुन्हे आहेत. गोरेगाव पोलिसांच्या हद्दीतून ४१० ग्राम चा अवैध गांजा एका उबेर कार मधून जप्त करण्यात आला असून एनडीपीएस नार्कोटिस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पूर्व येथून जिवंत काडतूस आणि बंदूक जप्त करण्यात आली असून आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध शस्त्र जप्त
मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध प्रकरणांत अवैधरित्या शस्त्र बाळगणे आणि बेकायदेशीररित्या शस्त्र विकण्याच्या आरोपात भारतीय दंड विधानाच्या आर्म्स ऍक्ट कायद्यानुसार आतापर्यंत परवाना नसलेली ३९७ शस्त्र जप्त करण्यात आली असून परवाना धारकांकडून ३९१ शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. यामध्ये तलवारी, चाकू, कोयता, देशी कट्टा, बंदुका, काडतूस, चॉपर सारख्या शस्त्रांचा समावेश आहे.

सीआरपीसी प्रतिबंधात्मक कारवाई
फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची ३५०६ प्रकरणे विचारात घेण्यात आली असून ४७९ प्रकरणांत अंतरिमबंधपत्र (इंटरिम बॉण्ड ) घेण्यात आली आहेत. तर २८१० प्रकरणांत अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. तसेच १०९६ प्रकरणांत अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आला असून ४५७ प्रकरणांत अद्यापपर्यंत कार्यवाही सुरु आहे.

तपासणी नाके
मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १२५ तपासणी नाके कार्यरत आहेत.

मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघात रु. ४७.९१ लाख किंमतीचे अवैध मद्य आणि वाहने जप्त करण्यात आली असून आतापर्यंत १८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत रु. १५.५१ लाख किंमतीचे २३ हजार ५८२ लिटर्स अवैध मद्य जप्त करण्यात आले असून १७ वाहने ही जप्त करण्यात आली आहेत.

Note
बातमी पाहिला मेलला पाठवली होती मात्र विडिओ न भेटल्यामुळे पुन्हा पाठवत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.