ETV Bharat / state

Sexual abuse students: महापालिकेच्या शाळेत ३ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, पालकांनी चोप दिल्यानंतर पीटीच्या शिक्षकाला अटक - mumbai municipal school

शारीरिक शिक्षण देण्याच्या नावाखाली पीटीच्या शिक्षकानं विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची घटना विक्रोळीत घडली. शिक्षक लैंगिक छळ करत असल्याची तक्रार काही विद्यार्थिनींनी पालकांकडे केली होती. त्यांनतर पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. हा प्रकार विक्रोळी पूर्व येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत घडला.

विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण
विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 9:58 AM IST

मुंबई: विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना विक्रोळी पूर्व परिसरातील घडली. येथे मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेत 3 मुलींवर पीटीच्या म्हणजेच शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सौरव दीपक उचाटे (वय 23), असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे. आज आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

शिक्षण देण्याच्या नावाने छळ : ही घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झालेत. आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जातेय. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींवर 23 वर्षीय शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संतापलेल्या पालकांनी नराधम शिक्षकाला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. विक्रोळी पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षकाला अटक करण्यात आल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. या नराधम शिक्षकाला आज विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

8 दिवसांपासून सुरू होता प्रकार : आरोपी सौरव उचाटे हा ठाण्यात राहणारा असून तो विक्रोळीतील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शारीरिक शिक्षण शिकवतो. या नराधम शिक्षकानं पीटीच्या तासांच्या वेळी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मागील 8 दिवसांपासून सुरू होता. मंगळवारी शाळा सुटल्यावर एका विद्यार्थिनीनं या प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी या शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी इतर दोन पीडित विद्यार्थिनींनी त्यांची आपबीती सांगितली. आमच्यासोबत देखील पीटी शिक्षकानं असंच केल्याची तक्रार या विद्यार्थिनींनी केली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी शिक्षकाला मारहाण करून पोलिसांच्या हवाली केलं.

हेही वाचा-

  1. मुंबईत चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रिक्षा चालकास अटक
  2. Nagpur Crime News: 'त्या' हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक; सेक्सटोर्शन केसमध्ये सक्रिय सहभाग
  3. धक्कादायक! शिक्षकाकडूनच शौचालयात 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.