ETV Bharat / state

Javed Akhtar Application Rejected: जावेद अख्तर यांच्या समन्सला आव्हान देणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला - मुंबई सत्र न्यायालय

गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी महानगर दंडअधिकारी यांच्या समन्सला आव्हान देणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे आता त्यांना याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तालिबानी प्रवृत्तीचे म्हणून संबोधले होते. त्यानंतर महानगर दंडाधिकारी यांच्याकडे मुंबई तक्रार दाखल झाली होती. या घटनेप्रकरणी जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आला होता. याला त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने त्यांची समस्या वाढली आहे.

Javed Akhtar Application Rejected
जावेद अख्तर
author img

By

Published : Mar 20, 2023, 10:22 PM IST

मुंबई: सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभर आणि जगात तालिबान यांच्या हायदोषाबाबत प्रसार माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सर्व पार्श्वभूमीवर देशामध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तालिबानी प्रवृत्तीचा असल्याचे जावेद अख्तर यांनी प्रतिक्रियेदरम्यान म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अनेक लोकांनी निषेध देखील केला होता. त्यावेळेला समाज माध्यमांतून अख्तर यांच्यावर टीकादेखील करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना त्यांनी तालिबानी संघटना प्रवृत्तीच्या लोकांसोबत केली होती. देशामध्ये सर्वत्र धर्मरक्षक दुडगुज घालतात आणि ते तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे त्यांनी त्यावेळेला म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा समाज आणि प्रसार माध्यमातून निषेध देखील करण्यात आला होता. याबाबत मुंबईतील राम स्वरूप दुबे यांनी मुलुंड या ठिकाणी तक्रार दाखल केली होती.

पुराव्याच्या आधारे समन्स: खासगी स्वरूपाची तक्रार दाखल केल्यामुळे मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी त्यांना कायद्यानुसार असलेल्या अधिकारानुसार जावेद अख्तर यांना या संदर्भात समन्स जारी केला होता. या जारी केलेल्या समन्सला जावेद अख्तर यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयांमध्ये आव्हान दिले होते. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती घुले यांनी अख्तर यांचा अर्ज् फेटाळून लावला आहे. मुंबईतील तक्रारदार दुबे यांनी जावेद अख्तर यांनी त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना तालिबान यांच्याशी केल्यानंतर समाज माध्यमांमध्ये त्यांचे वक्तव्य प्रसारित झाले होते. त्या वक्तव्याचे फोटो आणि व्हिडिओ क्लिप स्थानिक पोलिसात तक्रार देताना तक्रारदाराने दाखल केले होते. त्यानंतर ही याचिका मुंबई महानगर दंडाधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी आली. याचिकाकर्त्याकडून दाखल झालेल्या पुराव्याच्या आधारे जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आला होता.

आता हायकोर्टाकडूनच अपेक्षा: या समन्सला आव्हान जावेद अख्तर यांनी दिले होते. त्यामुळेच मुंबई सत्र न्यायालय याबाबत कोणता निर्णय देते त्याकडे प्रसार माध्यमांचे आणि देशातल्या जनतेचे लक्ष लागले होते. आज न्यायमूर्ती घुले यांनी सविस्तर या प्रकरणावर निकाल देत जावेद अख्तर यांचा समन्सला आव्हान देणारा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात जावेद अख्तर यांना अर्ज करण्याशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा: Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी स्वत:ला भारत समजायला लागले! संघ,भाजप म्हणजे देश नाही -राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.