मुंबई : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची सुनावणी 20 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी 20 एप्रिल पर्यंत हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांना सीए महेश गुरव याना अंतरिम दिलासा दिलेला आहे.
20 एप्रिल दिलासा : हसन मुश्रीफ यांच्या मुलांबाबत अंमलबजावणी संचलनालयाने कथित कंपनीमध्ये, बँकेमध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोप ठेवला गेला. यासंदर्भात हा गंभीर आरोप असल्यामुळे विविध प्रकारचे कलम लावून त्यांना अटक करणे जरुरी आहे. त्यांच्या अटकेसाठी साधार काही परिस्थिती आणि इतर पुरावे उपलब्ध आहे. त्यामुळेच तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये; असे इडीच्या वकिलांचे आधीच्या सुनावणीमध्ये म्हणणे होते. यावेळी देखील अंमलबजावणी संचलनालयाने तीच भूमिका मांडली होती. मात्र, तिन्ही मुलांच्या बाजूने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या फेब्रुवारीच्या निर्देशा आधारे त्यांना अंतरिम दिलासा 20 एप्रिल पर्यंत मिळावा अशी मागणी केली होती. अखेर तीनही मुलं साजिद नावेद आणि अमित यांना अंतरिम दिलासा मिळालेला आहे.
ईडीचा दावा मुलांचा सहभाग : हसनमुश्रीफ यांच्या मुलांकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती कुठून आली असा सवाल उपस्थित झाला आहे. हसन मुश्रीफ यांनी शेअर सर्टिफिकेटचे आमिष दाखवून शेतकर्यांकडून पैसे गोळा केले. मात्र, ते पैसे मुश्रीफ यांच्या मुलांच्या नावे असलेल्या कंपन्यांच्या खात्यात वळते केले आहेत. यावरून हा शेड्युल गुन्हा असल्याचे सरळसरळ स्पष्ट होते. अशी भूमिका अंमलबजावणी संचनालयाच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. मात्र, तीनही मुलांनी सीए महेश गुरव यांना केवळ अडकवण्यासाठी आरोप केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि विविध सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे पाहता यांना अंतरिम दिलासा मिळायला हवा अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. आज त्यांच्या साजिद ,नाबीद, आबिद यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन सत्र न्यायालयाने उपलब्ध तथ्य पाहून 20 एप्रिल पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.