मुंबई - थोड्या वेळापूर्वी थांबलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. अजूनही संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, आता वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. तसेच ठाणे - अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पावसाने, कल्याण-कर्जत लोकल सेवा ठप्प झाली आहे. बेस्ट, लोकल यासोबत हवाई वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली होती. दरम्यान, सकाळी 7 नंतर विमानसेवाही पूर्ववत झाली आहे.
Live Update :
- 12:30 PM - मुसळधार पावसाने उल्हास नदीला पूर आल्याने १३ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ६ रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. तर २ रद्द करण्यात आल्या आहेत. - मध्य रेल्वे
- 10:31 AM - कल्याण ते कर्जत/खोपोली सोडून मध्य रेल्वेच्या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत - मध्य रेल्वे
- 9:52 AM - महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उतरू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
- 9:50 AM - थांबलेला पाऊस पुन्हा सुरू
- 9:31 AM - मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत
कल्याण ते सीएसएमटी वेळेनुसार सुरू
बदलापूर,कर्जत, कसारा अजून लोकल सुरू नाहीत.
कल्याण कडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने
चाकरमानी निघाले घरातून
दुसरा शनिवार असल्याने गर्दी कमी
27 आणि 28 मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
मुंबईत पाऊसाची उघडी
- 8:42 AM - मुसळधार पावसामुळे अंबरनाथ येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या उशीराने तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.
- खालील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
कर्जत-पनवेल-दिवा
११०२८ चेन्नई-मुंबई मेल येणार २७-७-२०१९
११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस येणार २७-७-२०१९
२२१४९ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस ही एक्सप्रेस पनवेल येथे थांबवण्यात आली आहे.
- पुढील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
११०९७ पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस रद्द
११०९८ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस रद्द
मुसळधार पावसामुळे १७४१६ कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस रद्द
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस दाखल झाले. त्यांच्यामार्फत प्रवाशांना बिस्किट्स आणि पाण्याच्या बाट्ल्या पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट सेवाही विस्कळीत झाली आहे. हवाई वाहतुकीलाही या मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने आतापर्यंत 7 विमानांची उड्डाण रद्द केली होती. तर ८ ते ९ विमानाच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. मात्र, आता ही विमानसेवा पूर्ववत झाली आहे.
दरम्यान या पावसामुळे, कल्याणमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.