ETV Bharat / state

मुंबईमधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या गर्दीसाठी रेल्वे प्रशासन सज्ज

कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्या रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्या स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे तिकिट आरक्षित आहे. अशाच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांची थर्मल स्क्रीन केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाला नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

author img

By

Published : Apr 12, 2021, 6:11 PM IST

रेल्वे प्रशासन सज्ज
रेल्वे प्रशासन सज्ज

मुंबई - वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यात लॉकडाऊन लागण्याच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांच्या हजारोंच्या संख्येने मुंबईतून गावाकडे परतू लागले आहेत. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळू लागली आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेने कंबर कसली असून त्याप्रमाणे नियोजन सुरू केले आहे.

आरक्षित तिकीट असणाऱ्यांना प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असल्याने मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून आली होती. कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोजना करण्यात आल्या आहेत. ज्या रेल्वे स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्या स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच ज्या प्रवाशांचे तिकिट आरक्षित आहे. अशाच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांची थर्मल स्क्रीनींग केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीवर रेल्वे प्रशासनाला नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.

माहिती देतांना प्रतिनिधी
वरिष्ठ रेल्वे अधिकारी उतरले रस्त्यावर
मुंबईसह उपनगरीतून हजारो परप्रांतीयानी रेल्वेच्या माध्यमातून गावी जात आहे. अनेक रेल्वे गाड्यांचे पुढील काही दिवसांचे आरक्षित आसनांची क्षमता संपली आहे. परिणामी रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नयेत म्हणून विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्वतःहून रेल्वे स्थानकांवर जाऊन निरीक्षण करत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवाशांच्या गर्दीचे निरीक्षण केले आहे. काही सूचना रेल्वे सुरक्षा दलाला दिल्या आहेत.
२५ विशेष गाड्या
मुंबईसह राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येमुळे पुन्हा टाळेबंदी होण्याच्या भीतीने मुंबईत रोजगारासाठी आलेल्या मजुरांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे. रोजगार नाही आणि कामाचे पैसेही न मिळाल्याने त्रस्त झालेल्या मजुरांनी उत्तरप्रदेश, बिहारमध्ये आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. गेल्या काही दिवसांत आतापर्यत नियमित धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस व्यतिरिक्त २५ अतिरिक्त गाड्या चालविण्यात येत आहेत.
रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन
श्रमिक ट्रेन चालविण्यात येणार असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एलटीटी स्थानकात प्रवाशांनी विना तिकिट गावी जाण्यासाठी गर्दी केली. अशा कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या' चालविल्या जात नाहीत नियोजन नाही. रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.