मुंबई- कोरोना विषाणूचा प्रभाव जगभर मोठ्या प्रमाणात पसरत आहे. भारतातही त्याने पाय पसरायला सुरुवात केली आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक अफवांना उधान आले आहे. यामुळे जनतेच्या मनात भीतीसह या विषाणूबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारच्या अधिकृत वेबसाईट आहेत. त्यावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवावा. मात्र, आता कोरोनो संदर्भात जर कोणी अफवा पसरवेल तर त्याच्यावर मुंबई पोलीस कारवाई करणार आहे. याबाबत सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या देणाऱ्या आणि पसरवणाऱ्यांवर आम्ही कारवाई करतच आहोत. मात्र, जनतेने सुद्धा सध्याची परिस्थती पाहता योग्य ती खबरदारी घेणे गरजेच आहे, अशी विनंतीही हरीश बैजल यांनी केली.