मुंबई - शहरात नागरिकांना होळी आणि रंगपंचमीचा सन उत्साहात साजरा करण्यात यावा म्हणून मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रंगपंचमीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीराम वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या बाबतीत होणाऱ्या छेडछाडीच्या प्रकारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून साध्या वेशातील विशेष पथक नेमण्यात आली आहेत.
व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यास रंग लावल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरातील हुल्लडबाज, उपद्रवी व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे.