मुंबई - नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याच्या नादात अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. अनेक जण मद्यपान करून वाहने चालवतात. त्यामुळे थर्टीफस्टच्या रात्री अपघात घडतात. अशा बेदरकार वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. तब्बल ४० हजार पोलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा - वाघांकडून हरणाची शिकार, पेंच राष्ट्रीय उद्यानातील थरार कॅमेऱ्यात कैद
नव वर्षाच्या रात्री कायदा सुव्यव्यवस्था राखण्यासाठी विशेष पथके, एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक आणि कमांडो युनिट फोर्स अशा वेगवेगळ्या विभांगाचे जवान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत. यामध्ये महिला सुरक्षा आणि ड्रिंक अॅड ड्राईव्हवर सर्वात जास्त लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मरिन ड्राईव्ह, जुहु चौपाटी, माहीम, वर्सोवा, गिरगाव चौपाटीसह सर्वच किनारी भागावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून असणार आहेत.
हेही वाचा - 'करंजीचा सुपुत्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी' वडेट्टीवारांच्या वर्गमित्रांनी दिल्या शुभेच्छा3
सुरक्षेच्या दृष्टीने किनारी भाग, पब, पार्किंग लॉट, फाईव्ह स्टार हॉटेल अशा ठिकाणी पोलीस बारकाईने नजर ठेवून असणार आहेत. कारण येथे मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात. याठिकाणी साध्या वेशातील पोलीसही नजर ठेवून असणार आहेत. ५ हजार सीसीटीव्हींद्वारे विविध ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस उपअधीक्षक प्रयण अशोक यांनी सांगितले.
हेही वाचा - दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच वेगळी योजना - मुख्यमंत्री
अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच उपनगरातील मुंबईच्या प्रवेशदारावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई उपनगरातील मानखुर्द, मुलुंड, अशा मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल महामार्गावर उद्या मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
कारवाईसाठी लागणाऱ्या अल्कोहल डिटेक्टर मशीन, चलान मशीन इत्यादी यंत्रणा सज्ज केल्या गेल्या असून नव वर्षानिमित्त चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे. मंबई शहराच्या एन्ट्री पॉईंटवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. २८ तारखेपासूनच आम्ही मोहीम सुरू केली आहे. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त व्यंकट पाटील यांनी दिली.