ETV Bharat / state

Mumbai Police Threat Call : मुंबई पोलिसांना वारंवार धमकीचे फोन; हॉक्स कॉलिंगची काय आहे गडबड? - मुंबई पोलीस हॉक्स कॉलिंग

मुंबई पोलीस कायमच सतर्क असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना धमकीचे (Mumbai Police Threat Call) फोन वारंवार येत असल्याचे समोर (Mumbai Police Hoax Call) आले आहे. याबाबत तपासणी केली असता, हे सर्व फोन फेक असल्याची माहिती पुढे आली आहे. एका आठड्यात मुंबई पोलिसांना चारवेळा धमकीचे फोन आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 24, 2023, 10:00 PM IST

Updated : Jul 24, 2023, 10:22 PM IST

प्रतिक्रिया देताना मानसोपचार तज्ज्ञ

मुंबई - गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलिसांना धमकीचे वारंवार फोन येत आहेत. धमकीच्या फोनचे सूत्र दिवसेंदिवस वाढतच (Mumbai Police Threat Call) असून, थांबायचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्याभरात मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास तीनवेळा आणि वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षास एकवेळा फोन आला असल्याचे (Mumbai Police Hoax Call) निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अशा कृती वारंवार का घडतात. त्यामागील करणे आपण मानसोपचार तज्ज्ञांसोबत बोलून जाणून घेणार आहोत.

आपल्या मनावर ताबा नसणे म्हणजे आपल्या मनात उफाळणाऱ्या भावना आपल्याला न समजणे. त्यामुळे त्यांचे नियंत्रण न करता येणे ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. केवळ एका व्यक्तीपूर्ती मर्यादित नाही. कारण अशा भावनेच्या भरामध्ये आपण काय करतो हे आपल्याला उपजत नाही. त्याचे स्वतःवरती तसेच समाजावरती परिणाम होतातत. त्यामुळे एक वेगळेच अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते - डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ

मनावर ताबा ठेवणे गरजेचे - आपल्या मनातल्या भावना रागाच्या असतील, प्रेमाच्या असतील, सुडाच्या असतील, संतापाच्या असतील किंवा अगदी थिल्लर मस्करीच्या असतील. तरी त्या भावनांना योग्य प्रकारे समजणं आणि आवर घालणे, मनात येणारी कृती करण्यापूर्वी विचार करणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने याचे शिक्षण किंवा प्रशिक्षण आपल्याला शिक्षणातून मिळत नाही. त्यामुळे अशा कृती वारंवार घडताना दिसतात. अर्थात याच्यामध्ये तरुण वर्गाचा जास्त समावेश आहे. कारण उफाळत्या भावना या लोकांना जास्त जाणवत असतात. त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना घडत असतात. आपण समाज म्हणून त्या व्यक्तीला समजून घेण्याची आणि योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना मांडले आहे.

संतापलेल्या मुलाने केला पोलिसांना फोन - १८ जुलैला दुपारी आईने खेळण्यास बाहेर न जाऊ दिल्याने नऊ वर्षाच्या बालकाने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून जय अंबे चाळीत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी १८ जुलैला दुपारी हा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवून फोन केलेल्या नऊ वर्षाच्या बालकाची माहिती काढली. फोनची माहिती तात्काळ गुन्हे शाखेला देण्यात आली. गुन्हे शाखेने फोन करणाऱ्या बालकाचा तांत्रिक माहिती काढून शोध घेतला. यावेळी फोन करणारा नऊ वर्षाचा बालक असल्याचे निष्पन्न झाले. बालकाने दिलेली धमकी कशासाठी होती, याचे कारण कळल्याने पोलिसांनी बालकाच्या पालकांना समजावून सांगितले. बालक अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

मुंबई पोलिसांना धमकी - मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात सोमवारी १७ जुलैला देखील अज्ञात व्यक्तीने फोन करून मी घाटकोपर येथे राहत असून, काहींनी बॉम्ब ठेवल्याबद्दल बोलत असल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात देखील त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे टार्गेटवर असून त्यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आली होती. तसेच मुंबईत बॉम्ब आणि एके 47 पोहचले असून 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 506 अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांना वारंवार धमक्या - राज्य पोलीस दलाला कामाला लावणारा हॉक्स कॉल शनिवारी उशिरा रात्री १ वाजता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. फोन करणाऱ्याने म्हटले होते की, दोन पाकिस्तानी नागरिक आरडीएक्सने भरलेला टँकर घेऊन मुंबईहून गोव्याला जात आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या फोनची पणजी कार्यालयास माहिती दिली. पोलिसांनी तडक कारवाई करत रत्नागिरीजवळच्या वांद्री येथे एक संशयित टँकर पकडला. मात्र टँकरमध्ये काहीही संशयास्पद आढळलेले नाही. टँकरची बॉम्ब शोधक पथकाद्वारे कसून तपासणी केली असता, या टँकरमध्ये पॉलिथिन बनवण्यासाठीचे सामान असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांची दिली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी निलेश पांडे (वय ४३) या व्यक्तीला अटक केली असून तो घाटकोपर येथे राहणार आहे.

हेही वाचा -

  1. Threat Call To Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल; एक टँकर थांबवला अन्...
  2. Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत
  3. Mumbai Drone Laws: मुंबईत ड्रोन उडविण्यासह पाच किंवा जास्त लोक एकत्र येण्यावर २९ जुलैपर्यंत निर्बंध, जाणून घ्या नियम

Last Updated : Jul 24, 2023, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.