ETV Bharat / state

Mumbai Police summons Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना मुंबई पोलिसांचे समन्स, 25 जूनला चौकशीला हजर राहण्याचे निर्देश - भाजप नेत्या नुपूर शर्मा

चालू आठवड्याच्या सुरुवातीला शहरातील पायधुनी पोलिस स्टेशनमध्ये शर्मा यांच्याविरुद्ध टीव्ही वादविवादादरम्यान प्रेषितांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर एफआयआर दाखल ( FIR against Nupur Sharma in Paydhuni police ) करण्यात आला होता. टीव्हीवरील चर्चेदरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद ( Nupur Sharma controversy ) निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांना या प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. त्यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी संबंधित वृत्तवाहिनीकडून वादाचा व्हिडिओ मागविला होता.

नुपूर शर्मा
नुपूर शर्मा
author img

By

Published : Jun 12, 2022, 7:22 AM IST

Updated : Jun 12, 2022, 8:08 AM IST

मुंबई- भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या ( Nupur Sharma in trouble ) अडणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत.आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी ( Mumbai Police summons Nupur Sharma ) समन्स बजावले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना भाजप पक्षाने प्रवक्ता पदावरून निलंबित केले आहे.

चालू आठवड्याच्या सुरुवातीला शहरातील पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये शर्मा यांच्याविरुद्ध टीव्ही वादविवादादरम्यान प्रेषितांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर एफआयआर दाखल ( FIR against Nupur Sharma in Paydhuni police ) करण्यात आला होता. टीव्हीवरील चर्चेदरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद ( Nupur Sharma controversy ) निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांना या प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. त्यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी संबंधित वृत्तवाहिनीकडून वादाचा व्हिडिओ मागविला होता.

राज्यभरात निदर्शने- भाजपने नुपूर शर्मा यांना निलंबित केले. तर आणखी एक नेता नवीन जिंदाल यांना अशाच प्रकारच्या टिप्पण्या ट्विट केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी देशाच्या विविध भागात निदर्शने झाली. अनेक राज्यांमध्ये अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. महाराष्ट्रात सोलापूर, मुंबई, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात मोठी निदर्शने करण्यात आली आहेत.

भिवंडीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- चॅनेलवर वादग्रस्त विधान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याने रजा अकादमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक (४०) यांनी ३० मे रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. काल (शुक्रवारी) रजा अकादमीच्या सदस्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांची भेट घेऊन शर्मांवरील दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी केली असता, नुपूर शर्मा यांना १३ जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा-Protest Against Nupur Sharma : राज्यातील विविध भागात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर अमरावतीत पोलिसांचा बंदोबस्त
हेही वाचा-MIM massive Protest : एमआयएमच्या विराट मोर्चामुळे सोलापुरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत

हेही वाचा-Internet Services Suspended in Howarh : नुपूर शर्मा विरोधातील निदर्शनानंतर हावडामध्ये 3 दिवसांसाठी इंटरनेट बंद

Last Updated : Jun 12, 2022, 8:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.