मुंबई : मुंबईतील एका व्यक्तीकडे बनावट नोटा ( Mumbai Police Raid ) असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पवई पोलिसांनी छापा ( Mumbai Police Seized Fake Notes of Indian Currency ) टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ५०० रुपयांचे १६० बंडल व प्रत्येक बंडलमध्ये १०० नोटा अशा एकूण १६,००० नोटा एकूण किंमत ८०,००,०००/- (ऐंशी लाख) रुपये ( Total Value of Fake Notes is 80 Lakha Rupees ) मिळून ( Indian Currency Worth 80 Lakhs in Major Operation ) आले. आरोपीचे नाव सौजन्यभूषण पाटील (31) असून, त्याच्याकडून ८० लाखांच्या बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या ( Powai Police Conducted Raid and Arrested Accused ) आहेत.
पवई पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 489( अ), 489 (ब), 408 (क ), 489 (ड) 120 (ब), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कक्ष 10 चे पोलीस हवालदार सतीश कांबळे यांना 27 डिसेंबरला भारतीय चलनाच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून दैनंदिन व्यवहारामध्ये असणाऱ्या टोळीबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या मिळालेल्या माहितीप्रमाणे आंबेडकर गार्डनजवळ साकीविहार रोड, पवई, मुंबई येथे कक्षामार्फत सापळा रचून कक्ष 10ने कारवाई केली.
नोटांची मोजणी केली असता ५०० रुपयांचे १६० बंडल या कारवाईत आरोपी सौजन्य पाटील हा इसम युनिकॉर्न मोटार सायकल क्र. MH-48-AZ-1576 व एक लाल रंगाच्या बॅगसह सदर ठिकाणी संशयितरित्या उभा असलेला आढळून आला. त्याच्याजवळ असलेली बॅग चेक केली असता, त्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा असल्याच्या निर्दशनास आल्या. या नोटांची मोजणी केली असता ५०० रुपयांचे १६० बंडल व प्रत्येक बंडलमध्ये १०० नोटा अशा एकूण १६,००० नोटा एकूण किंमत ८०,००,०००/- (ऐंशी लाख) रुपये मिळून आले. या ठिकाणी छापा टाकून आरोपी इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या बनावट नोटा आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
भारतीय अर्थव्यवस्थेस क्षती पोहचविण्याचा इरादा या गुन्ह्यातील आरोपीने त्याचे साथीदारासह संगनमत करून स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेस क्षती पोहचविण्याचा इराद्याने तयार करण्यात आलेल्या बनावट भारतीय चलनी नोटा खऱ्या असल्याचा भासवून स्वतःजवळ बाळगताना मिळून आला म्हणून गुन्हा दाखल करून आरोपी सौजन्य पाटील याला अटक करण्यात आली.
अटक आरोपीस न्यायालयासमोर रिमांडकरिता हजर केले असता, न्यायालयाने त्यास 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.